चौकशीसाठी ‘तांडव’च्या दिग्दर्शकांच्या घरी पोहोचले उत्तर प्रदेश पोलिस; अली घरी नसल्याने घराबाहेर चिकटवली नोटीस

तांडव विरोधात हजरतगंज येथे दाखल तक्रारीत आरोपी करण्यात आलेल्यांच्या चौकशीसाठी सध्या उत्तर प्रदेश पोलिसांचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. गुरुवारी पथक अली यांच्या घरी पोहोचले, तेव्हा ते घरात नसल्याने पथकाने त्यांच्या घराबाहेर नोटीस चिकटवून त्यांना एका आठव़ड्यात लखनऊमध्ये हजर होण्यास सांगितले आहे.