अठराव्या वर्षीचे असताना त्यांनी आपल्या अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरूवात केली होती.

अमाप पैसा मिळवणे म्हणजे आयुष्यात यश मिळवणे हे साफ चुकीचे आहे. तुमचे शरीर ही तुमची संपत्ती असते. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी मध्येदेखील हेच सांगितले आहे. जर तुमचे शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य चांगले राहिले तरच तुम्ही आयुष्यातील छोट्या मोठ्या गोष्टींचा आनंद घेऊ शकाल. नाहीतर पैसा असूनही तुम्हाला जर छोट्या मोठ्या गोष्टींचा आनंद घेता येत नाहीये तर त्यापेक्षा मोठं दु:ख ते कोणतं?

आपण सेलिब्रेटींना पाहतो. त्याच्या लाइफस्टाइलला पाहतो. फॅन्सी कपडे, शूज, मेकअप सगळं आपल्याला भारावून सोडतं. पण आपण एक गोष्ट कदाचित दुर्लक्षित करतो. ती म्हणजे त्यांचा फिटनेस मंत्रा. सुपरस्टार मोहनलाल ६१ वर्षांचे आहेत आणि ते आजही रोज न चुकता जिमला जातात. जिममध्ये वर्कआउट करतात. नुकताच त्यांनी जिममध्ये वर्कआऊट करतानाचा एक व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

दृश्यम दोन हा नुकताच त्यांचा सिनेमा प्रदर्शित झाला होता. फक्त अठरा वर्षांचे असताना त्यांनी आपल्या अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरूवात केली होती. थिरोत्तम या सिनेमातून त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले होते. मोहनलाल यांचा सिनेमा प्रदर्शित होणार म्हटले की महिनाभर आधीच सर्व बुकिंग फुल्ल झालेले असते. त्यांचे चाहते त्यांना देव मानतात. इतका मोठा सुपरस्टार आजही जिममध्ये जाऊन स्वत:च्या आरोग्याची काळजी घेतो, हेच त्यांच्या यशाचे रहस्य असावे. तर आपणही आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी मोहनलाल यांच्या कडून प्रेरणा घेऊन लाइफस्टाइलमध्ये बदल घडवले तर काय हरकत आहे?

https://www.instagram.com/reel/CTGqu9onMI8/?utm_source=ig_web_copy_link