क्लासमेट्स, फास्टर फेणे, माऊली या सिनेमाचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार आता हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहेत

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर या दोघांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘स्त्री’ चित्रपटाच्या तुफान यशानंतर बॉलीवूडमध्ये हॉरर कॉमेडी सिनेमा बनवण्याचा एक ट्रेंडच आला आहे. या ट्रेंडमध्ये स्त्री सिनेमानंतर भूत पुलिस त्याचप्रमाणे रुही या सिनेमांनी आपला नंबर लावला आहे. आता हॉरर कॉमेडी कॅटॅगरीमध्ये आता आणखी एका सिनेमाची भर पडणार आहे. आरएसव्हीपी यांनी या सिनेमाची घोषणा नुकतीच केली आहे.

क्लासमेट्स, फास्टर फेणे, माऊली या सिनेमाचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार आता हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. रोनी स्क्रूवाला यांच्यासोबत त्यांनी ‘काकुडा’ या सिनेमासाठी टायअप केले आहे. या सिनेमामध्ये रितेश देशमुख, सोनाक्षी सिन्हा आणि साकिब सलीम हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहेत. काकुडा हा सिनेमा हॉरर कॉमेडी सिनेमा असणार आहे. २०२२ पर्यंत हा सिनेमा प्रदर्शित होईल, असे या सिनेमाचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी सांगितले आहे.

एक छोटं गाव आणि हे छोटं गाव वेळेच्या एका न समजणाऱ्या चक्रामध्ये अडकून राहिलेले आहे. त्यानंतर त्या गावात होणाऱ्या घटना, लव्ह ट्रँगल अश्या घटना दाखवणारा ह्या सिनेमाचा प्लॉट आहे. सोनाक्षी सिन्हा हिचा अजय देवगणसोबतचा ‘भूज’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. तर रितेश देशमुखच्या बाघी ३ नंतरचा काकुडा हा पहिलाच सिनेमा असणार आहे. रितेश आणि सोनाक्षी प्रथमच एका सिनेमासाठी एकत्र काम करताना दिसून येतील.