सोनू के टीटू की स्वीटी फेम अभिनेता कार्तिक आर्यनने आपल्या नवीन सिनेमाची घोषणा नुकतीच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून केली आहे. 'कॅप्टन इंडिया' असे या सिनेमाचे नाव आहे.

सोनू के टीटू की स्वीटी फेम अभिनेता कार्तिक आर्यनने आपल्या नवीन सिनेमाची घोषणा नुकतीच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून केली आहे. ‘कॅप्टन इंडिया’ असे या सिनेमाचे नाव आहे. रोनी स्क्रूवाला आणि हरमन बवेजा यांची निर्मिती असणारा हा सिनेमा प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता दिग्दर्शित करणार आहेत अशी चर्चा सध्या रंगली आहे. हंसल मेहता यांच्या अलिगड आणि शहीद या सिनेमांनी इंटरनॅशनल लेव्हलवर कौतुकाची थाप मिळवली होती. स्कॅम १९९२ ही त्यांची सीरिज २०२० मधील सर्वोत्कृष्ट सीरिज ठरली होती. कॅप्टन इंडिया ही मूव्ही रेस्क्यू ऑपरेशन वर आधारित मूव्ही असणार आहे. रिअल लाइफमध्ये घडलेल्या घटनांवर आधारित या मूव्हीमध्ये कार्तिक आर्यन पायलटचा रोल प्ले करणार आहे.

अतिशय बिकट परिस्थितीमध्ये विजय मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांनी माणुसकीचे दर्शन घडवणारी ही स्टोरी आहे. अशा सिनेमांमध्ये काम करणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. असे कार्तिक आर्यनने आपल्या इन्स्टाग्राम पोस्ट द्वारे आपल्या चाहत्यांना सांगितले आहे. व्हिक्टरी, व्हॉट्स युवर राशी, लव्ह स्टोरी २०५० या सिनेमांमध्ये काम करणारा अभिनेता हरमन बावेजा या सिनेमाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे. तर रोनी स्क्रूवाला यांचे पिप्पा, सितारा, इम्मॉर्टल अश्वथामा आणि तेजस हे सिनेमे प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत.

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन खाली बनणाऱ्या दोस्ताना या सिनेमातून कार्तिक आर्यनची हकालपट्टी करण्यात आली होती. अजून बऱ्याच सिनेमांमधून कार्तिक आर्यनला डच्चू देण्यात आला होता. त्यामुळे नेपोटिझमचा वाद पुन्हा जोर धरत असतानाच कार्तिकने आपल्या या नव्या सिनेमाची घोषणा करून आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.