अभिनेता सिद्धार्थ जाधव (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम हँडल)

सिद्धार्थ जाधव मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेला एक गुणी कलाकार. आपल्या विनोदाच्या टायमिंग करता ओळखला जाणारा सिद्धार्थ नाटक, टीव्ही आणि मोठा पडदा या सर्व क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करतो. आपला अभिनय दाखवून देतो. त्याचे सहकलाकार कायम म्हणतात की, ‘सिद्धार्थ जिथे असतो तिथले वातावरण नेहमी उत्साही असते.’
सिद्धार्थने आपल्या अभिनयाची सुरुवात बालनाट्यांपासून केली. तेव्हापासून त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. ‘हसा चकट फू’, ‘घडलंय बिघडलंय’ या सारख्या विनोदी मालिकांमध्ये त्याने मनापासून काम केले. ‘बकुळा नामदेव घोटाळे’ हा सिद्धार्थचा पहिला चित्रपट.

मराठीमध्ये एक से एक व्यक्तिरेखा साकारणाऱ्या सिद्धार्थची गाडी हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळाली ते रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल : फन अनलिमिटेड’मुळे. आपल्या अभिनयाचा जलवा सिद्धार्थ आता फक्त मराठीच नव्हे तर बॉलिवूडमध्ये सुद्धा दाखवत आहे. सिद्धार्थचा प्रत्येक चित्रपट हा वेगळ्या धाटणीचा असतो. या एनर्जीटिक व्यक्तीने असंख्य मराठी चित्रपटात वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत.

दे धक्का – महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटाला सिद्धार्थच्या भूमिकेने चार चांद लावले आहेत.
बाप रे बाप
गाव तसा चांगल
सालीने केला घोटाळा
मी शिवाजी राजे भोसले बोलतोय – या चित्रपटातील ‘उस्मान पारकर’ या व्यक्तिरेखेसाठी सिद्धार्थचे विशेष कौतुक झाले. यातला उस्मान हा एक गुंड असतो.
बाप रे बाप डोक्याला ताप
टार्गेट
शिक्षणाच्या आईचा घो
हुप्पा हुय्या– सिद्धार्थ यात हनुमानाचा भक्त दाखवला आहे. यात सिद्धार्थ आपल्याला हनुमानाच्या ११ भक्तिस्थळांची सफर करून आणतो.
क्षणभर विश्रांती- चार मित्रांच्या यारी दोस्तीत सिद्धार्थ आपली वेगळी छाप सहज सोडून जातो.
लालबाग परळ
इरादा पक्का – यातला रोहित (सिद्धार्थ) व त्याची बायको अध्या (सोनाली) यांना संसारत काहीतरी वेगळेपणा आणायचा असतो आणि याचसाठी या दोघांनी घातलेला धुमाकुळ चित्रपटात एक वेगळीच गोडी आणतो.
पारध

भैरू पैलवान की जय हो
सुंबरान
शहाणपण देगा देवा
भाऊचा धक्का
फक्त लढ म्हणा
कुटुंब – प्रामाणिक व्हॅन चालकाची भूमिका साकारत आपल्या मित्राच्या मुलांना डान्सची स्पर्धा जिंकवून देण्यासाठी सिद्धार्थने केलेला आटापिटा. यामध्ये तो आपल्या अभिनयाने सर्वांचे लक्ष त्याचा अभिनयाकडे वेधून घेतो.
नवा गडी, नवं राज्य
खो खो – या चित्रपटातल्या सिद्धार्थच्या भूमिकेबद्दल आजही बोलले जाते. एका आदिमानवाची भूमिका आणि भाषा सिद्धार्थ अगदी सहजरित्या करून गेला आहे.
टाइम प्लीज – प्रिया आणि उमेशचा लग्नात हिम्मतरावच्या (सिद्धार्थ) येण्याने काय धम्माल उडते हे या चित्रपटात दाखवले आहे.
प्रियतमा – शेक्सपिअरच्या रोमिओ- जुलिएट या व्यक्तिरेखांवर आधारित हा सिनेमा आहे.
अगं बाई अरेच्चा 2
ढोलकी
शासन
फास्टर फेणे – या चित्रपटात उलटी रिक्षा चालवत एक छोटीशी पण विनोदी व्यक्तिरेखा सिद्धार्थने साकारली आहे.
येरे येरे पैसा- सनीची भूमिका साकारत आपल्या बबलीसाठी (तेजस्विनी पंडित) पैसे कमावण्यासाठी केलेली धडपड चेहऱ्यावर हसू आणते.
माऊली
सर्व लाईन व्यस्त आहेत
धुरळा – निवडणुकीवर आधारित असलेल्या या सिनेमामध्ये सिद्धार्थने चित्रपटाचा नावा प्रमाणेच धुरळा उडवला आहे.

मराठी प्रमाणेच हिंदीमध्ये ही सिद्धार्थने आपल्या अभिनयाचा झेंडा रोवला.
गोलमाल : फन अनलिमिटेड
गोलमाल रिटर्न्स
सिंम्बा – या चित्रपटात रणवीर सिंह आणि सारा अली खानसोबत सिद्धार्थने आपल्या कॉमेडी टायमिंगने सर्वांना खूश केले.

या वर्षी सिद्धार्थचा दे धक्का २ प्रदर्शित होऊ शकतो.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *