अभिनेता सुबोध भावे (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार )

अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून लोकप्रिय असणारा सुबोध भावे आपल्याला असंख्य मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम करताना दिसतो. कोणतीही भूमिका साकारताना तो त्या भूमिकेला जिवंत करण्याचा प्रयत्न करतो. सुबोधने अनेक व्यक्तींच्या जीवनपटात काम केले आहे त्यामध्ये स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्त्व करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘लोकमान्य- एक युग पुरुष’ या चित्रपटात टिळकांची उत्कृष्ट भूमिका केल्याबद्दल सुबोधचे नेहमी विशेष कौतुक होत असते.

सुबोधच्या अनेक मालिका गाजल्या आहेत, त्यापैकी तुला पाहते रे, का रे दुरावा, कळत नकळत, कुलवधू, अवंतिका या मालिकांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरले.

सुबोधचा प्रत्येक चित्रपट हा वेगळ्या धाटणीचा असतो.

क्षण

आव्हान

सनई चौघडे – सई ताम्हणकर, श्रेयस तळपदे यांच्या साथीने सुबोधचा हा पहिला गाजलेला चित्रपट. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली दाद मिळाली होती.

उलाढाल

एक डाव धोबी पछाड – या विनोदी चित्रपटात मराठी शिक्षकाची भूमिका साकारत सुबोधने आणलेली धम्माल प्रेक्षकांच्या नेहमी लक्षात राहते.

त्या रात्री पाऊस होता

अग्निदिव्य

कोण आहे रे तिकडे

झाले मोकळे आकाश

हापूस – आंबा शेतकऱ्यांच्या हक्कासाठीचा लढा,  या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

लाडी गोडी

बालगंधर्व – विसाव्या शतकात रंगभूमीवर अतिशय लोकप्रिय ठरलेल्या गायक, अभिनेते यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. सुबोधने या चित्रपटात बालगंधर्व यांची भूमिका साकारली आहे.

पाऊलवाट

चिंटू – एका लोकप्रिय मराठी वृत्तपत्रात येणाऱ्या कॉमिकवर आधारित हा चित्रपट आहे.

चिंटू 2

अनुमती

अ रेनी डे

लोकमान्य एक युग पुरुष –  ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात लोकमान्य टिळकांची भूमिका तंतोतंत वठवण्यात सुबोध यशस्वी झाला आहे.

कट्यार काळजात घुसली – सुबोध भावे दिग्दर्शित या चित्रपटाद्वारे मराठी रंगभूमीवरील अत्यंत लोकप्रिय आणि गाजलेले कट्यार काळजात घुसली या नाटकाचे मोठ्या पडद्यावर रूपांतर करण्यात आले. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला .

बंध नायलॉनचे

किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी

फुगे –

हृदयांतर

तुला कळणार नाही

पुष्पक विमान – मोहन जोशी आणि सुबोध यांच्या जोडीने चित्रपटात रंगत आणली.

सविता दामोदर परांजपे

डॉक्टर काशिनाथ घाणेकर – कोणत्याही भूमिकेचं सुबोध सोनं करू शकतो या गोष्टीवर या चित्रपटामुळे शिक्कामोर्तब झाले.

अप्पा आणि बाप्पा

भयभीत

एबी आणि सिडी

या वर्षी सुबोधचा ‘पाणी’ हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *