शहरी मुलीची भूमिका असो किंवा एखाद्या खेडवळ मुलीची, मुक्ता जेव्हा अभिनयास उभी राहते तेव्हा ती प्रत्येक भूमिका जिवंत करते असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार )

मुक्ता बर्वे ही मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेली आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक. आपल्या निरागस अभिनयाने ती प्रेक्षकांची मने सहज जिंकून जाते. मुक्ता टेलिव्हिजन, सिनेमा आणि नाटक या तिन्ही माध्यमांवर नेहमी वेगवेगळ्या भूमिका घेऊन आपल्या समोर येते. जबरदस्त काम करण्याऱ्या मोजक्या अभिनेत्रींपैकी मुक्ताचे नाव वरच्या स्थानावर आहे. ‘देहभान’, ‘फायनल ड्राफ्ट’, ‘कबड्डी कबड्डी’, ‘कोडमंत्र’ या सारख्या दर्जेदार नाटकात भूमिका साकारत ती अनेक पुरस्कारांची मानकरी ठरलेली आहे. मुक्ताचे अनेक सिनेमे गाजले आहेत त्यापैकी ‘जोगवा’ या तिच्या सिनेमाचे नेहमीच कौतुक होताना दिसते. तसेच ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेतील ‘राधाआणि ‘अग्निहोत्रया मालिकेतील मंजुळा या दोन्ही भिन्न भूमिका मुक्ताने रेखाटल्या आहेत. शहरी मुलीची भूमिका असो किंवा एखाद्या खेडवळ मुलीची, मुक्ता जेव्हा अभिनयास उभी राहते तेव्हा ती प्रत्येक भूमिका जिवंत करते असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे.

अभिनया बरोबरच मुक्ताने काही कार्यक्रमांचे सूत्रसंचालन देखील केले आहे तर काही नाटकांची निर्मिती देखील केली आहे. मुक्ताने असंख्य मराठी सिनेमात अभिनय केला आहे.

चकवा

माती माय

सावर रे

एक डाव धोबी पछाड – या सिनेमात मुक्ताने सहायक अभिनेत्रीची भूमिका साकारली.

जोगवा – या सिनेमाने मुक्ताला खरं यश मिळवून दिले. तायप्पा आणि सुलीची प्रेमकथा सगळ्यांच्याच मनाचा ठाव घेते. हा सिनेमा जोगतिणींच्या आयुष्यावर आहे.

मुंबई-पुणे-मुबई – या पहिल्या भागात एक मुंबईची मुलगी साकारत मुक्ताने आपले लक्ष वेधून घेतले. हा चित्रपट व्यावसायिक पातळीवर खूप यशस्वी ठरला.

सुंबरान

आघात

बदाम राणी गुलाम चोर

लग्न पाहावे करून – अदिती आणि निशांत एक विवाहसंस्था उघडतात ज्यात त्यांना सिद्ध करायचे असते की कुंडली न बघता सुद्धा लग्न टिकू शकतात. या सिनेमातील उमेश आणि मुक्ता या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरले.

मंगलाष्टक वन्स मोर – नवरा बायकोची ही प्रेम कहाणी यात दाखवण्यात आली आहे. स्वप्नील आणि मुक्ताच्या दमदार अभिनय हा सिनेमा पुन्हा पुन्हा बघण्यास भाग पाडतो.

डबल सीट – कोकणातील मुलगी जेव्हा लग्न करून पहिल्यांदा मुंबईला येते तेव्हा ती कशी न डगमगता आणि प्रामाणिक कष्ट करून आपल्या नवऱ्यासोबत आपली स्वप्न कशी पुरी करते हे या सिनेमात दाखवले आहे.

हायवे

मुंबई-पुणे-मुंबई २ –  या सिनेमामुळे मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशीची जोडी पुन्हा एकदा आपल्या भेटीस येते.

गणवेश

वाय झेड – अगदी लहान भूमिका असली तरी मुक्ताचे पात्र सिनेमात एक वेगळीच मजा आणते आणि कायम लक्षात राहते.

हृदयांतर

आम्ही दोघी – हा सिनेमा बेधडक आणि बिनधास्त अशा सावीच्या आणि अडाणी व बुजऱ्या स्वभावाच्या अम्मीच्या, आयुष्यावर आधारित आहे. कमीत कमी अपेक्षा ठेऊन दोन वेगळ्या स्वभावाच्या स्त्रियांची मैत्री कशी घट्ट असू शकते हे या सिनेमात दाखवले आहे.

मुंबई-पुणे-मुंबई ३ – दोन सुपरहिट भागांनंतर गौतम आणि गौरी म्हणजेच स्वप्नील आणि मुक्ता पुन्हा एकदा आपल्याला त्यांच्या प्रेमात पडायला भाग पाडतात.

वेडिंगचा सिनेमा

स्माईल प्लिज – एक पुरस्कारप्राप्त छायाचित्रकार जेव्हा वैयक्तिक संकटातून जात असते तेव्हा तिचा आयुष्यात आलेले नवे वळण तिला कुठे आणि कसे नेते हे या सिनेमात दाखवण्यात आले आहे.

आता बास

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *