प्रिया मराठे हिने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत चाहत्यांना कोड्यात टाकले. या पोस्टमध्ये ती असे म्हणाली की, " सध्या सगळी कामे ऑनलाईन चालू आहेत. ऑनलाइन हा नवा नियम झाला आहे. म्हणूनच आम्हीसुद्धा येत आहोत ऑनलाईन! कशासाठी? ते कळेल लवकरच." (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार )

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये सगळेच सध्या घरून काम करत आहेत. यात कलाकारसुद्धा मागे नाहीत. अनेक अभिनेत्यांनी लॉकडाऊनमध्ये घरूनच मालिका किंवा वेब सीरिजचे शूटिंग केले. घरून शूट केलेल्या या वेब सीरिज चाहत्यांच्या चांगल्याच पसंतीस उतरल्या.

कोरोनामुळे प्रत्यक्ष भेटून शूटिंग करणे शक्य नसल्याने सगळ्यांनी ऑनलाइन येण्याचा पर्याय निवडला. यात आता अजून एका अभिनेत्रीची भर पडली आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत चाहत्यांना कोड्यात टाकले.

या पोस्टमध्ये ती असे म्हणाली की, ” सध्या सगळी कामे ऑनलाईन चालू आहेत. ऑनलाइन हा नवा नियम झाला आहे. म्हणूनच आम्हीसुद्धा येत आहोत ऑनलाईन! कशासाठी? ते कळेल लवकरच.”

प्रेक्षक सिनेमे विविध ऑनलाईन वेवबाईट्सवर पाहू शकतात पण गेल्या तीन महिन्यांपासून नाट्यगृहबंद असल्यामुळे नाटकांशी प्रेक्षकांचा संबंध तुटल्यासारखा झाला आहे. हेच लक्षात घेत हृषिकेश जोशी दिग्दर्शित ‘मोगरा’ हे नाटक सर्वांच्या भेटीला आले. या नाटकात स्पृहा जोशी, वंदना गुप्ते, भार्गवी चिरमुले यांच्या मुख्य भूमिका आहेत.

तर सुनील बर्वे यांच्या सुबक या संस्थेने ही एक भन्नाट कल्पना शोधून काढली. ‘ऑनलाईन माझं थिएटर’ या माध्यमातून २० कलाकार अभिनयाच्या स्पर्धेत उतरलेले आपल्याला दिसत आहेत. ही स्पर्धा पूर्णपणे ऑनलाईन असल्यामुळे प्रेक्षक शनिवारी आणि रविवारी या स्पर्धेचा आस्वाद घेऊ शकतात.

मयुरी वाघ, संकर्षण कऱ्हाडे, आरोह वेलणकर या सारखे दिग्गज कलाकार या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत. प्रिया मराठेसुद्धा याचा एक भाग आहे.

आता प्रियाच्या या पोस्टमुळे हे नवे सरप्राईज काय असणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिलंय.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *