'थलायवी' चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी बनविली खास योजना; व्हिडीओ शेअर करत कंगनाने केला खुलासा / फोटो इन्स्टाग्रामवरून साभार

अभिनेत्री कंगना राणावतची आगामी ‘थलायवी’ या फिल्मचे ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आले असून त्यावरून चाहत्यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी कंगनाचे कौतुक केले आहे. ही फिल्म येत्या 23 एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी निर्माते आणि कंगना यांनी एक विशेष योजना बनविली आहे. ही योजना चाहत्यांसाठीच बनविण्यात आली असून आपल्या ट्वीटर हँडलवरून एक व्हिडीओ शेअर करून कंगनाने त्याबाबत खुलासा केला.

कंगनाने ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करून त्यासोबत एक पोस्टही केली. त्यात तिने या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी तिच्यासह निर्मात्यांनी बनविलेल्या खास योजनेबाबत माहिती दिली. चाहत्यांना तिने धुलवडीच्या शुभेच्छा दिल्या पोस्टमध्ये तिने लिहिले, ‘सर्वांना होळीच्या शुभेच्छा. मी खूपच उत्साहपूर्ण काहीतरी शेअर करू इच्छिते. जया मां आयुष्यभर लोकांसाठीच जगल्या. सुरुवातील सुपरस्टार बनून त्यांनी लोकांची मने जिंकली. नंतर क्रांतिकारी नेत्याचे स्थान त्यांना देण्यात आले. त्यांचे हेच वैशिष्ट्य लक्षात घेऊन आमच्या टीमने एक उत्साहपूर्ण मोहीम सुरू केली आहे. ज्याच्या प्रसिद्धीचे सर्व निर्णय तुम्ही घ्यायचे आहेत. तुम्ही यात भाग घ्या #VoteForThalaivi आणि फिल्मची प्रसिद्धी निश्चित करा धन्यवाद.’

या योजनेबाबत आता चाहत्यांमध्येही उत्सुकता दिसून येत आहे. ‘थलायवी’ चित्रपटासाठी कंगनाने खूप मेहनत घेतली असून तिच्या वाढदिवशी म्हणजे 23 मार्च रोजी या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले. त्यातील तिचा अभिनय आणि भूमिका पाहून चाहत्यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दिग्दशर्क ए. एल. विजय यांनी या चित्रपटाचे दिग्दशर्न केले असून एका मुलाखतीत त्यांच्याबाबत बोलताना कंगना खूपच भावूक झाली होती. ‘साधारणपणे पुरुष अभिनेत्यांबाबत दाखविले जाणारे सौहार्द दिग्दर्शक विजय यांनी माझ्याबाबतीत दाखविले जे कोणा अभिनेत्रीच्याबाबतीत पाहायला मिळत नाही. दिग्दर्शक म्हणून कोणत्याही अभिनेत्याशी कसे वागावे हे त्यांच्याकडून शिकले’, असे तिने सांगितले.

makers and kangana ranaut made special strategy for thalaivi filmpromotion