सई ताम्हणकर ओळखली जाते ते तिनी साकारलेल्या भूमिकांमुळे (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार )

सई ताम्हणकर ही मराठी सिनेविश्वातील एक सुप्रसिध्द आणि यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या हटके अदा आणि बिनधास्त वागण्याने ती मराठीच नव्हे तर आता हिंदी चित्रपटसृष्टीतही विविध भूमिका साकारू लागलीये.

२०१३ साली प्रदर्शित झालेल्या दुनियादारी या चित्रपटाने सईला नवीन ओळख मिळवून दिली. मूळची सांगलीची असलेल्या सईला तिचा अभिनयातील पहिला ब्रेक ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेतून मिळाला. त्या नंतर तिने ‘अग्नी शिखा’, ‘कस्तुरी’ ‘अनुबंध’ या सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले.

सई ताम्हणकर ओळखली जाते ते तिनी साकारलेल्या भूमिकांमुळे. प्रत्येक भूमिकेत जीव ओतून काम करणारी सई कधी सोज्ज्वळ, कधी बेधडक, कधी बोल्ड, कधी समजूतदार, कधी निरागस अशा वेगळ्या ढंगात कायम आपल्याला बघायला मिळते. सईला सिनेमात काम करताना पाहणे ही एक पर्वणीच असते.

ब्लॅक अँड व्हाईट – सईने सुभाष घईच्या क्राईम थ्रिलर असलेल्या या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

सनई चौघडे – या मराठी चित्रपटातून सईने मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री केली. या नंतर सईने मागे वळून पहिलेच नाही.

पिकनिक

हाय काय नाय काय

रिटा

बे दुणे साडे चार

गजनी – आमीर खान सोबतचा ब्लॉकबस्टर सिनेमा.

झक्कास – या चित्रपटात अंकुश चौधरी, अमृता खानविलकर, पूजा सावंत यांच्यासोबत काम केले.

नो एन्ट्री, पुढे धोका आहे – या चित्रपटामुळे साली सई ताम्हणकर चर्चेत आली. सलमान खान, अनिल कपूर असलेल्या हिंदी सिनेमाचा हा मराठी रिमेक होता. यात सईने केलेली ‘बॉबी’ ही भूमिका बोल्ड होती.

बालक पालक

नवा गडी, नवं राज्य – प्रिया बापट, उमेश कामत सोबतचा हा रोम-कॉम सिनेमा खूपच चालला

पुणे ५२

दुनियादारी – सईला ओळख मिळवून दिली ते २०१३ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील शिरीन या तिच्या व्यक्तिरेखेने. बच्चू आहेस तू या तिच्या डायलॉगने तरूणाईला वेड लावले.

पोस्टकार्ड

गुरुपौर्णिमा

पोर बाजार

प्यार वाली लव्ह स्टोरी – हा चित्रपट गाजला तो सई आणि स्वप्नील जोशी यांच्या केमिस्ट्रीमुळे.

क्लासमेट्स – या सुपरहिट सिनेमामध्ये सईचा टॉम बॉय अंदाज आणि तिची भाईगिरी सगळ्यांचाच पसंतीस उतरली.

हंटर – या हिंदी चित्रपटाने चांगलाच धुमाकुळ घातला होता.

वाय झेड – या चित्रपटात देव भोळी आणि निरागस व्यक्तिरेखा सईने साकारली

जाऊन द्या ना बाळासाहेब – या चित्रपटात बाळासाहेबांची बालमैत्रिण करिष्मा या गावातील मुलीचा अभिनय सईने अगदी सहज केला.

फॅमिली कट्टा – या चित्रपटासाठी सईला मराठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला.

वजनदार

लव्ह सोनिया – या चित्रपटासाठी सईचे विशेष कौतुक केले गेले.

गर्लफ्रेंड – या चित्रपटातील बेधडक आलिशा सईने उत्तमरित्या साकारली.

या वर्षी सई ‘मला आई व्हायचं आहे’ या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक ‘मिमी’मध्ये दिसणार आहे. तर ‘मीडियम स्पायसी’ या मराठी चित्रपटात झळकणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *