सोनालीने असंख्य मराठी चित्रपटांत निरनिराळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. अप्सरा आली या तिच्या सुप्रसिध्द गाण्यावर केलेल्या लावणी नृत्यामुळे अवघ्या महाराष्ट्राची ती लाडकी अभिनेत्री झाली. (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार )

सोनाली कुलकर्णी ही मराठी सिनेविश्वातील आघाडीची अभिनेत्री. आपल्या सुंदर अभिनयाने ती प्रेक्षकांचा मनाचा ठाव घेते. सोनालीने आपल्या करिअरची सुरुवात बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटातून केली. मूळची पुण्याची असलेल्या सोनालीला अभिनयाबरोबरच नृत्याचीही आवड आहे. अप्सरा आली या तिच्या सुप्रसिध्द गाण्यावर केलेल्या लावणी नृत्यामुळे अवघ्या महाराष्ट्राची ती लाडकी अभिनेत्री झाली. ही गुणी अभिनेत्री अनेक पुरस्कारांची मानकरी सुद्धा ठरलेली आहे.

सोनाली सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. तिला महाराष्ट्राची फॅशन आयकॉन असे ही संबोधले जाते. आपला प्रत्येक लूक ती अगदी सहजपणे कॅरी करू शकते. इन्स्टग्रामवर तिचे दहा लाख फॉलोअर्स आहेत. या वरून आपल्याला समजते की सोनालीचा चाहता वर्ग किती मोठा आहे. सोनालीने असंख्य मराठी चित्रपटांत निरनिराळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत.

बकुळा नामदेव घोटाळे – या चित्रपटासाठी सोनालीला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा’ झी गौरव पुरस्कार प्राप्त झाला.

नटरंग – सोनाली ही प्रामुख्याने या चित्रपटातील अभिनयामुळे ओळखली जाते. तिच्या ‘अप्सरा आली’ या गाण्याला लोकांची विशेष दाद मिळाली.

क्षणभर विश्रांती

इरादा पक्का – अध्या (सोनाली) व तिचा नवरा रोहित (सिद्धार्थ) यांना संसारत काहीतरी वेगळेपणा आणायचा असतो आणि याचसाठी या दोघांनी घातलेला धुमाकूळ या चित्रपटात एक वेगळीच गोडी निर्माण करतो.

समुद्र

अजिंठा- सोनालीने यात एका आदिवासी मुलीची व्यक्तिरेखा साकारली आहे.

झपाटलेला २

रमा माधव – मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित या ऐतिहासिक चित्रपटात सोनालीने आनंदीबाई रघुनाथराव पेशवे यांची भूमिका अगदी सुंदरपणे साकारली आहे.

क्लासमेट्स

मितवा – यात स्वप्नील जोशी आणि सोनालीची केमिस्ट्री सगळ्यांच्याच पसंतीस उतरली आहे. या चित्रपटासाठी सोनालीला झी गौरव ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ या पुरस्काराकरिता नामांकन प्राप्त झाले होते.

टाइमपास २- ‘मदन पिचकारी’ या गण्यावर नृत्य करीत सोनाली सगळ्यांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेते.

शटर

पोश्टर गर्ल – ‘रुपाली’ ही व्यक्तिरेखा साकारत शेती आणि मुलींचे महत्त्व सगळ्यांना पटवून देणारी सोनाली प्रत्येक घरात असावी असे वाटते.

तुला कळणार नाही

हम्पी – यात सोनाली एका वेगळ्या लूकमध्ये दिसली आहे. यात ती आपल्याला हम्पीची सफर घडवते.

ती & ती

हिरकणी – हा एक ऐतिहासिक चित्रपट असून, या करता सोनालीने बरेच महिने तयारी केली होती. ही गोष्ट आहे हिराची, एक साधी गावाकडची महिला. जेव्हा रायगड किल्ल्याचे दरवाजे बंद होतात तेव्हा बाळाच्या ओढीपायी एका आईने केलेली धडपड यात दाखवली आहे.

धुरळा –निवडणुकीवर आधारित असलेल्या या चित्रपटात सोनाली आपले वेगळे स्थान निर्माण करते.

सोनालीने मराठी सोबतच हिंदी चित्रपटात ही अभिनय केला आहे.

ग्रँड मस्ती – या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सोनालीने प्रवेश केला.

सिंघम २ – या चित्रपटात सोनालीने पाहुण्या कलाकाराची भूमिका निभावली आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *