अभिनेता आदिनाथ कोठारे (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार )

१९९४ साली  ‘माझा छकुला’ या चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण करणारा आणि या चित्रपटातील अभिनयाकरता महाराष्ट्र राज्याचा ‘सर्वोत्कृष्ट बाल कलाकार’ हा महत्वाचा पुरस्कार पटकवणार सर्वांचा लाडका अभिनेता म्हणजे आदिनाथ कोठारे. आदिनाथ हा निर्माते -दिग्दर्शक महेश कोठारे यांचा मुलगा. ‘माझा छकुला’ नंतर आदिनाथने ‘पछाडलेला’, ‘खबरदार’ या सुपरहिट चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शकाची जबाबदारी पार पाडली. २०१० साली वडील महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘वेड लावी जीवा’ या चित्रपटातून आदिनाथने अभिनय क्षेत्रात पुन्हा पदार्पण केले.

आदिनाथने मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कानेटकरशी २०११ साली विवाह केला. या दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. इतकेच नाही तर या जोडीचे अनेक चाहते आहेत. सोशल मीडियावर या जोडीचे अनेक फॅन क्लब देखील आहेत. आदिनाथ याने दिग्दर्शित केलेल्या ‘पाणी’ या चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन फिचर फिल्म’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. आदिनाथने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच आता ‘८३’ या चित्रपटाद्वारे लवकरच तो हिंदी सिनेविश्वात पदार्पण करणार आहे.

वेड लावी जीवा – या चित्रपटात आदिनाथ बरोबर अभिनेत्री  वैदेही परशुरामी ही मुख्य भूमिकेत दिसली आहे..

दुभंग

सतरंगी रे –  सतरंगी रे हा चित्रपट पदवीच्या शेवटच्या वर्षाला शिकत असणाऱ्या मुलांचा आहे. या मित्रांना संगीतात विशेष रुची असते. या मुलांच्या आयुष्यात असे काही प्रसंग घडतात ज्यामुळे त्यांचे सगळे आयुष्य बदलून जाते. आदिनाथ बरोबर या चित्रपटात अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, आणि पूजा सावंत हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

झपाटलेला २ – या चित्रपटात आदिनाथ बरोबर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही मुख्य भूमिकेत आहे.

हॅलो नंदन

अनवट

इश्क वाला लव्ह

प्रेमासाठी कमिंग सून

अवताराची गोष्ट

साटं लोटं पण सगळं खोटं

निळकंठ मास्तर – नीलकंठ मास्तर ही स्वातंत्र्यपूर्व काळातली एक प्रेमकथा आहे. या चित्रपटात केलेल्या अभिनयासाठी  ओमकार गोवर्धन, आदिनाथ कोठारे आणि पूजा यांचे विशेष कौतुक नेहमीच करण्यात येते.

टेक केअर गुड नाईट – या चित्रपटात आदिनाथ बरोबर पर्ण पेठे, सचिन खेडेकर, इरावती हर्षे हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसतात. या चित्रपटात आदिनाथने खलनायकाची भूमिका साकारली.

पाणी – आदिनाथने दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट.

हिंदी चित्रपट:

८३ – १९८३ साली भारताने पहिल्यांदा जिंकलेल्या क्रिकेट विश्वचशकावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात आदिनाथ दिलप वेंगसरकर यांची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *