अभिनेता आदिनाथ कोठारे (फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार)

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता दिग्दर्शक आदिनाथ कोठारे हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. तो नेहमीच त्याचे फोटो तसेच त्याची मुलगी जीजासोबतचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. चाहते नेहमीच त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करतात. नुकताच आदिनाथने त्याचा आज एक सुंदर टीशर्टमधला स्माईली फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याच्या या फोटोवर चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

आदिनाथने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. नेहमीप्रमाणे तो यामध्ये सुंदर दिसत आहे. फोटोमध्ये त्याने ऑरेंज रंगाचा टीशर्ट घातलेला पहायला मिळत आहे. सिंपल टीशर्टवर त्याने तितकीच भारी स्माईल ही दिली आहे. तो अतिशय सुंदर दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनला त्याने लिहिलयं की, जेव्हा तुम्ही ऑर्डर केलेले पदार्थ तुमच्या समोर येतात तेव्हा त्याकडे पाहून अशी स्माईल चेहऱ्यावर झळकते..! अशा शब्दांमध्ये त्याने हा फोटो शेअर केला आहे. आदिनाथच्या चाहत्यांना त्याचा हा सिंपल स्माईली लूक भलताच आवडला असून त्यांनी लगेच त्याच्या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी त्याच्या या फोटोवर पसंती दर्शवली आहे.

आदिनाथ कोठारेला आपण एक उत्तम अभिनेता म्हणून ओळखतोच तसेच तो एक यशस्वी दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. आदिनाथने ‘माझा छकुला’ या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात एका बालकलाकाराच्या भूमिकेत तो झळकला होता. त्यानंतर त्याने त्याचे वडील अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या अनेक चित्रपटांमध्ये सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले. ‘झपाटलेला २’, ‘सतरंगी रे’ यांसारख्या अनेक चित्रपटांमधील त्याच्या भूमिकांना प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले आहे. आदिनाथ लवकरच अभिनेता रणवीर सिंगच्या ‘८३’ या आगामी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.