ट्रिपल आर, गंगुबाई काठियावाडी, रॉकी और राणी की प्रेमकहाणी, ब्रह्मास्त्र, जी ले जरा असे आलियाचे चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत.

संजय लीला भन्साळींच्या “गंगुबाई काठियावाडी’ या सिनेमाचा टीझर मागे प्रदर्शित झाला होता. या टीजरमध्ये आलियाचा नवा लूक पाहून चाहते अगदी घायाळ झाले होते. आलियाची ॲक्टिंग, तिची डायलॉग डिलिव्हरी, तिचा कॉन्फिडन्स या सर्वांवर प्रेक्षक अक्षरशः भाळले होते असेच म्हणावे लागेल. पुन्हा एकदा नव्या रूपामध्ये आलियाला पाहायला मिळणार म्हणून तिचे चाहतेदेखील प्रचंड खूश झाले होते. काही दिवसांपूर्वीच धर्मा प्रोडक्शनच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम पेजवर आलियाच्या नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. रणवीर सिंग तिच्यासोबत या सिनेमांमध्ये झळकणार आहे. ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ असे या सिनेमाचे नाव आहे. आणि या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात देखील झाली आहे. शूटिंग लोकेशन वरून आलियाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांसमोर आला आहे. लाल रंगाची साडी, मोठी टिकली, काजळ आणि चेहऱ्यावरील कातीलाना लूक यामुळे आलिया पुन्हा एकदा नव्या भूमिकेमध्ये आणि नव्या कॅरेक्टरमध्ये पाहायला मिळणार आहे हे मात्र नक्की.

आलियाचा हा लूक पाहून तिचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत असणार. कारण आलियाने हरेक प्रकारच्या भूमिका साकारून आपण एक उत्कृष्ट अभिनेत्री आहोत हे वेळोवेळी दाखवून दिले आहे. उडता पंजाबमधील शेतात काम करणारी साधी मुलगी असो किंवा स्टुडंट ऑफ द इयर मधील रिच, बोल्ड, ब्युटीफुल गर्ल असो किंवा राझी सिनेमातील पाकिस्तानात जाऊन स्पाय म्हणून काम करणारी धाडसी मुलगी असो किंवा हायवेमधील फ्री स्पिरीटेड मुलगी जी दुनियदारीच्या खोट्या दिखावा करणाऱ्या दुनियेपासून लांब जाऊ इच्छिते ती वीरा असो. आलियाने प्रत्येक भूमिकेमध्ये जीव ओतून काम केले आहे आणि याचे फळ म्हणजेच आलिया आज बॉलीवूडमधील सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे. ट्रिपल आर, गंगुबाई काठियावाडी, रॉकी और रानी की प्रेमकहानी, ब्रह्मास्त्र, जी ले जरा असे आलियाचे चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत.