बाहुबली सिनेमाचे दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या ट्रिपल आर ह्या आगामी सिनेमात आलिया भट्ट झळकणार आहे. असं म्हटलं जातं की आलियाने या सिनेमासाठी सहा कोटी रूपये मानधन घेतले आहेत. तर बातमी अशीही आहे की आलिया एका दिवसाच्या शूटिंगचे पन्नास लाख रुपये इतकी फी घेते.

आपल्या अभिनय कौशल्यावर मेहनत घेऊन आपल्या अभिनयाचा दर्जा उंचावणे काय असते हे आलिया भटटच्या करिअरवर नजर टाकल्यावर समजते. आलियाने ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमानंतर तिचे अभिनय कौशल्य पाहून समीक्षकांकडून तसेच प्रेक्षकांकडून ती बरीच ट्रोल झाली हाेती. त्यात नेपोटिझमचा मुद्द्यांमुळे देखील तिला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता. या सर्वांमध्ये भर म्हणून कॉफी विथ करण या शोमध्ये तिला विचारण्यात आलेल्या ‘भारताचे प्रेसिडेंट कोण’ या प्रश्नाला दिलेल्या उत्तरामुळे तर आलिया भट्ट वरील जोक्स प्रचंड व्हायरल झाले होते.

बाहुबली सिनेमाचे दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या ट्रिपल आर ह्या आगामी सिनेमात आलिया भट्ट झळकणार आहे. तिच्यासोबत या सिनेमामध्ये ज्युनियर एनटीआर, रामचरण आणि अजय देवगण अशी तगडी स्टारकास्ट आहे. असं म्हटलं जातं की आलियाने या सिनेमासाठी सहा कोटी रूपये मानधन घेतले आहेत. तर बातमी अशीही आहे की आलिया एका दिवसाच्या शूटिंगचे पन्नास लाख रुपये इतकी फी घेते.

थोड्या दिवसांपूर्वी ट्रिपल आर सिनेमातील आलिया भट्टचा लूक प्रसिद्ध करण्यात आला होता. हिरव्या रंगाची साडी, कुरळे केस, कपाळावर मोठी काळ्या रंगाची टिकली या लूक मध्ये आलिया कमालीची सुंदर दिसत होती. चेहऱ्यावर अबोल दु:खी आणि तितकाच कणखर आणि प्रेमळ भाव यामुळे तिच्या रुपात एका वेगळ्याच सौंदर्याची झलक दिसली होती.

उडता पंजाब, राजी, हायवे, गली बॉय, बद्रिनाथ की दुल्हनिया, डियर जिंदगी, कपूर अँड सन्स या सर्व सिनेमांमधून तिने आपण एक सर्वोत्तम अभिनेत्री आहोत हे वेळोवेळी सिद्ध केलेच आहे. त्यामुळे बॉलीवूडमधील तिचा दर्जा तर उंचावलाय त्याचप्रमाणे ती सिनेमासाठी आकारात असलेल्या मानधनाच्या आकड्यांमध्ये देखील वाढ झाली आहे. आलिया भट रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.