अभिनेता आलोक राजवाडे (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार )

अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून लोकप्रिय असणारा तरुण कलाकार म्हणजे आलोक राजवाडे. आलोक आपल्याला अनेक चित्रपटांत आणि नाटकांमध्ये वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारताना दिसतो. आलोकने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ‘अब्राहम लिंकनचे पत्र’ या नाटकातून केली. या नाटकात आलोकला मुख्य भूमिका साकारायला मिळाली. २००९ साली आलोकने ‘बोक्या सातबंडे’ या चित्रपटातून मराठी सिनेविश्वात पदार्पण केले. या चित्रपटात आलोकने अगदी लहान पण महत्वाची भूमिका साकारली आहे. यानंतर २०१० साली आलोकने अभिनेता अमेय वाघ मुख्य भूमिकेत असलेल्या ‘गेली एकवीस वर्ष’ या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन केले. या नाटकाला बरेच यश मिळाले. आलोकने या नंतर अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले. त्याने दिग्दर्शित केलेली ‘दोन शूर’, ‘बिनकामाचे संवाद’, ‘सिंधू सुधाकर रम आणि इतर’ ही रंगभूमीवर गाजलेली नाटके आहेत.

आलोकने २०१३ साली दिग्दर्शित केलेल्या ‘मी गालिब’ या नाटकाचे प्रयोग अजूनही हाऊसफुल्ल होतात. विशेष म्हणजे फोर्ब्ज मासिकाने २०१७ मध्ये प्रसिद्ध केलेल्या ३० वर्षाखालील ३० प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शकांच्या यादीमध्ये आलोकचा समावेश करण्यात आला होता. आलोकने मराठीसह काही हिंदी चित्रपटात देखील अभिनय केला आहे. या वर्षी मार्च महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले आहे.

बोक्या सातबंडे

विहीर – २००९ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटने आलोकला सिनेविश्वात अभिनेता म्हणून ओळख मिळवून देण्यास सुरुवात केली. उमेश कुलकर्णी दिग्दर्शित या चित्रपटात आलोक बरोबर पर्ण पेठे, ज्येष्ठ अभिनेता डॉक्टर मोहन आगाशे हे मुख्य भूमिकेत होते.

चिंटू

हा भारत माझा

रमा माधव –  मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित या ऐतिहासिक चित्रपटात आलोकने  माधवराव पेशवे यांची मुख्य भूमिका  साकारली होती. या चित्रपटानेच आलोकला चित्रपटसृष्टीत खरी ओळख मिळवून दिली. या चित्रपटातील अलोकच्या अभिनयाचे आजही कौतुक केले जाते.

राजवाडे अँड सन्स –सचिन कुंडलकर दिग्दर्शित या चित्रपटात आलोकला ज्येष्ठ अभिनेते सतीश आळेकर यांच्या नातवाची भूमिका साकारायला मिळाली. या चित्रपटात अलोकसह मृण्मयी गोडबोले, सिद्धार्थ मेनन, मृणाल कुलकर्णी, सचिन खेडेकर हे मुख्य भूमिकेत दिसतात.

फॅमिली कट्टा – या चित्रपटात आलोकला ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, अभिनेत्री वंदना गुप्ते, सई ताम्हणकर यांच्या बरोबर अभिनय करण्याची संधी मिळाली.

कासव – मोहन आगाशे निर्मित तसेच सुमित्रा भावे दिग्दर्शित या चित्रपटाला २०१७ साली राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या चित्रपटात आलोकसह इरावती हर्षे आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे हे मुख्य भूमिकेत दिसतात.

पिंपळ

हिंदी चित्रपट

देख तमाशा देख

डिअर मोली

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *