अभिनेत्री अमृता खानविलकर (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार)

अमृता खानविलकर ही मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनयाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीत असण्यासोबतच अमृता सोशल मीडियाद्वारेही नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असते. सोशल मीडियावर ती नेहमी आपल्या वेगवेगळ्या लूकमधील अनेक फोटो चाहत्यांशी शेअर करत असते. या फोटोंमुळेही ती नेहमी चर्चेत असते. आताही अमृताने तिचे काही लेटेस्ट फोटो आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट केले आहेत. या फोटोत अमृता खुपच खूश दिसत असून यामध्ये तिचे निखळ हास्य पाहायला मिळत आहे.

अमृताने पोस्ट केलेल्या फोटोत ती  ग्लॅमरस अंदाजात दिसून येत आहे. फोटोत ती व्हाईट कलरच्या आऊटफिटमध्ये असून केस मोकळे सोडलेले दिसत आहे. तसेच तिच्या गळ्यात गोल्डन रंगाचे वेगवेगळे लॉकेट्सही दिसत आहेत. आपल्या चेहऱ्यावरील निखळ हास्याद्वारेच अमृता चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. फोटो शेअर करत तिने लिहिले की, ‘हसणे ही एक नवीन गोष्ट शिकले आहे’.

अमृताचा हा ग्लॅमरस अंदाज पाहून तिचा पती हिमांशू मल्होत्रानेही कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. हिमांशूने हार्टच्या इमोजींसोबत खूपच सुंदर असे लिहित अमृताच्या प्रती त्यांचे प्रेम व्यक्त केले आहे. हिमांशूसोबत इतर अनेक सेलिब्रिटीही अमृताच्या फोटोंचे कौतुक करत आहेत. तर, चाहतेसुद्धा तिचे हे फोटो पाहून तिच्या सौंदर्यावर फिदा होत लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

अमृताने २००४ साली झी टीव्हीवरच्या ‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार की खोज’ या स्पर्धेतून आपल्या करिअरची सुरुवात केली. ‘गोलमाल’ या मराठी चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक मराठी चित्रपटात काम केले. ‘नटरंग’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक करण्यात आले. मराठीसोबत हिंदीतही अनेक चित्रपटात काम करत तिथेही तिने आपली ओळख निर्माण केली आहे.

नुकताच अमृताचा  ‘वेल डन बेबी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अमेझॉन प्राईम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ९ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अमृतासोबत अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्या प्रमुख भूमिका आहेत.