अनुपम खेर यांना मिळाले गिफ्ट (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार)

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता अनुपम खेर सोशल मीडियावर फारच सक्रिय असतात. याद्वारे ते नेहमी सामाजिक मुद्द्यांवर आपले मत मांडत असतात. सोबतच कधीकधी ते त्यांना आवडलेला एखादा व्हिडिओ किंवा एखादी पोस्ट चाहत्यांशी शेअर करत असतात. नुकतेच अनुपम यांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ते भारतीय पद्धतीचे पारंपारिक खाद्यपदार्थ दाखवत आहेत. तसेच हे खाद्यपदार्थ त्यांना गिफ्ट म्हणून मिळाले (Anupam Kher Got Delicious And Authentic Rajasthani Food) असल्याचे अनुपम या व्हिडिओत सांगत आहेत. हे खाद्यपदार्थ पाहून तुम्हाला खाण्याची इच्छा झाल्याशिवाय राहणार नाही.

अनुपम खेर व्हिडिओत सांगत आहेत की, तुम्ही खूप त्रस्त होणार आहात. कारण हे तुम्ही खाणार नाहीत तर, मी खाणार आहे मित्रांनो. हे खूपच भारी आहे तसेच खूपच पारंपारिक आणि स्टायलिश पद्धतीने बिर्ला यांच्याकडून मला हे गिफ्ट मिळाले आहे. मी काय सांगू. हे खूपच भारी आहे. खूप खूप धन्यवाद.

व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिले की, धन्यवाद बिर्लाज, मला असे स्वादिष्ट आणि अस्सल राजस्थानी पदार्थ पाठविल्याबद्दल. अशा उदार मनाने माझ्यावर दया करून इतके स्टायलिश गिफ्ट मला पाठविलात. हे मला खायला मिळत असल्याने मी खूपच आनंदी आहे. धन्यवाद आणि जय हो.

अनुपम यांच्या या व्हिडिओवर चाहते अनेक कमेंट करत आहेत. त्यांना याप्रकारे भारतीय पद्धतीचे गिफ्ट मिळाल्याचे पाहून चाहतेही खूप आनंदी होत आहेत. तसेच हे पदार्थ दिसायला खूपच स्वादिष्ट वाटत असून ते खाण्याची इच्छा होत असल्याचे चाहते कमेंटद्वारे सांगत आहेत.

अनुपम यांच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास ते ‘वन डे’ या चित्रपटात शेवटचे दिसले होते. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेत्री ईशा गुप्ता मुख्य भूमिकेत होती. त्यापूर्वी अनुपम यांनी भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.

नुकतेच अनुपम यांचे नवीन पुस्तक ‘अनुपम खेर- यूअर बेसट डे इज टुडे’ लाँच करण्यात आले. लवकरत ते ‘कूची कूची होता है’ या अॅनिमेटेड चित्रपटासाठी आपला आवाज देणार आहेत. सोबतच ते ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटातही दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री करत आहेत.