परी, बुलबुल, पाताळलोक, एनएच टेन, फिल्लोरी अशा अनेक उत्कृष्ट सिनेमांची निर्माती असणारी अनुष्का शर्मा काही वर्षांपूर्वीच क्रिकेटर विराट कोहलीसोबत विवाहबद्ध झाली आहे.

रब ने बना दी जोडी या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने बॉलीवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. मॉडेलिंगपासून सुरू केलेला तिचा हा प्रवास बॉलीवूडमधील एक सक्सेसफूल अभिनेत्री आणि निर्माती इथपर्यंत येऊन पोहोचला आहे. परी, बुलबुल, पाताललोक, एनएच टेन, फिल्लोरी अशा अनेक उत्कृष्ट सिनेमांची निर्माती असणारी अनुष्का शर्मा काही वर्षांपूर्वीच क्रिकेटर विराट कोहलीसोबत विवाहबद्ध झाली आहे. या दोघांना नुकतीच एक मुलगी झाली आहे. त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव ‘वामीका’ असे ठेवले आहे.

सध्या चित्रपटांमधून तिने काही काळापुरता एक ब्रेक घेतला असला तरी, ती आपला पती व क्रिकेटर विराट कोहलीसोबत प्रत्येक दौऱ्यात  जाते. दोघे नेहमीच आपले फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नुकताच अनुष्काने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ती एका कॅफेमध्ये बसली असून, एकदम रिलॅक्स मूडमध्ये, प्रसन्न, आनंदी दिसत आहे. अनुष्का सध्या आयुष्यातील सर्वात चांगल्या फेजमधून जात आहे, हे या फोटोकडे पाहिल्यावर लगेच कळून येईल.

अनुष्काने बऱ्याच हिंदी सिनेमांमध्ये काम करून आपण एक उत्कृष्ट अभिनेत्री आहोत, याची वेळीच दखल घेण्यास भाग पाडले आहे. परी या मूव्हीमध्ये केलेल्या रोलचे सर्वत्र कौतुक झाले होते. जन्मतः शापित असणाऱ्या मुलीचा रोल तिने अतिशय उत्कृष्टरीत्या या सिनेमामध्ये निभावला होता. त्याचप्रमाणे सुईधागा या सिनेमातील तिच्या रोलचे देखील प्रचंड कौतुक झाले होते. पीके, मटरू की बिजली का मंडोला, संजू, सुईधागा, दिल धडकने दो, जब तक है जान, बॉम्बे वेल्वेट, झिरो, जब हॅरी मेट सेजल अशा अनेक सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारुन तिने नेहमीच आपण उत्कृष्ट अभिनेत्री आहोत हे आपल्या अभिनयातून सिद्ध केले आहे.