नटरंग सिनेमातील तिच्यावर चित्रित झालेले अप्सरा आली हे गाणे प्रचंड हिट ठरले होते.

पारंपरिक वेशभूषा आणि दागिन्यांना अतिशय ग्लॅमरसपणे कॅरी करणारी अभिनेत्री कोण? असं म्हटलं तर फक्त सोनाली कुलकर्णी हेच नाव डोळ्यासमोर येतं. सोनाली कुलकर्णीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक नजर फिरवली तर आपल्याला लक्षात येईल की सोनाली प्रत्येक लूक किती ग्रेसफुली कॅरी करते. आणि स्वतःच्या पर्सनॅलिटीमुळे त्या लूकला एक वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. हिरकणी, अजिंठा, तुला कळणार नाही अशा बऱ्याच सिनेमामधून वेगवेगळ्या भूमिका साकारून आपल्या अभिनयाची झलक दाखवणारी अभिनेत्री अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अप्सरा गर्ल म्हणून ओळखली जाते. नटरंग सिनेमातील तिच्यावर चित्रित झालेले अप्सरा आली हे गाणे प्रचंड हिट ठरले होते. सोनालीने बऱ्याच सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारून आपण एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहोत हे वेळोवेळी सिद्ध केले आहेच.

नुकताच सोनालीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पिंक ड्रेसमधला अतिशय ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. लाइट मेकअप, हेवी काजळ, नो अक्सेसरीज या लूकमध्ये ती खूपच डॅशिंग दिसत आहे.

एप्रिल महिन्यापासून तिने आपल्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी डाएट आणि एक्झरसाइज शेड्यूल सुरु केले होते. या पूर्ण वेळामध्ये तिने बरेच एक्झरसाइज व्हिडिओ आपल्या चाहत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. आणि तिच्यामध्ये झालेला हा फिट लूक चेंज खरंच अतिशय सुंदर दिसत आहे. असं म्हणतात की वय जसजसे वाढत जाईल तसे एक स्त्री अजूनच सुंदर दिसते. पण असं नुसतं म्हणून कोणीही सुंदर दिसत नाही. यासाठी सोनालीसारखा व्यायाम करावा लागतो आणि हेल्दी डाएट करावं लागतं. सोनाली आपल्या सर्व चाहत्यांसाठीही फिटनेस क्षेत्रामध्ये तसेच अभिनय क्षेत्रामध्ये आणि आयुष्य जगण्याच्या कलेमध्ये एक आदर्श असणार हे मात्र नक्की.