नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेला साजन हा सिनेमा लॉरेन्स डिसुझा यांनी दिग्दर्शित केला होता.

१९९१ मध्य प्रदर्शित झालेल्या साजन सिनेमा आठवतोय? हाच तो सिनेमा ज्यामध्ये सलमान खान, माधुरी दीक्षित आणि संजय दत्त लीड रोलमध्ये होते. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरला होता. या सिनेमातील गाण्यांनी लोकांना अक्षरशः वेड लावले होते. तू शायर है, मेरा दिल भी कितना पागल है या गाण्यांना लोकांनी आपली पसंती दर्शवली होती. सोमवारी, ३० ऑगस्ट रोजी या सिनेमाच्या प्रदर्शनाला तीस वर्षं पूर्ण झाली आहेत. होय. तीस वर्षे.

माधुरी दीक्षित सध्या डान्स दिवाने या डान्स रिएलिटी शोमध्ये जज म्हणून काम करते. या शो च्या सेटवरून तिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सोबत तू शायर है या गाण्यावर एक रील बनवून आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. आणि आपल्या सिनेमाला तीस वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद आपल्यासोबत शेअर केल्याबद्दल तिने उर्मिलाचे आभार देखील मानले आहेत. उर्मिलाने देखील हा डान्स रील आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. आणि माधुरीसोबत स्क्रीन शेअर करायला मिळाल्याबद्दल तिने माधुरी बद्दलचे आपले प्रेम आणि आदर व्यक्त केला आहे.

नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेला साजन हा सिनेमा लॉरेन्स डिसुझा यांनी दिग्दर्शित केला होता. तर सुधाकर बोडखे हे या सिनेमाचे निर्माते होते त्या वर्षांतील सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा साजन ठरला होता  माधुरीने हरेल शेअर केल्यानंतर काही कालावधीच्या आतच प्रचंड व्हायरल होताना दिसून येतोय या रिलमध्ये माधुरीने गुलाबी रंगाचा लेहंगा घातला आहे तर उर्मिलाने निळ्या रंगाचा वनपीस घातला आहे  दोघीही प्रचंड सुंदर दिसून येत आहेत दिसताहेत.

https://www.instagram.com/reel/CTM0mX_AvJc/?utm_source=ig_web_copy_link