अभिनेत्री भाग्यश्री मोटे (फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार)

छोट्या पडद्यावर अभिनयाचा श्रीगणेशा करत थेट चित्रपटांपर्यंत पोहचलेली नवोदित अभिनेत्री अर्थात भाग्यश्री मोटे. स्टार प्रवाहवर गाजलेल्या ‘देवयानी’ या मालिकेमध्ये भाग्यश्रीने काम केले होते. भाग्यश्री मराठी आणि साऊथ चित्रपटांमध्ये देखील झळकली आहे. भाग्यश्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती सतत तिचे विविध ग्लॅमरस लूक्समधील फोटो चाहत्यांकरता शेअर करत असते. तिने आतापर्यंत काही बोल्ड आणि बिनधास्त फोटोही शेअर केले आहेत. तिच्या फोटोंना चाहत्यांकडूनही चांगलीच पसंती मिळते. नुकताच भाग्यश्रीने तिचा साडीतला सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

भाग्यश्रीने इन्स्टाग्रामवर तिचा गोल्डन किनारीच्या व्हाईट ऑफबीट रंगातील साडीतला मस्त फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने याला कॅप्शनही मजेशीर दिले आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिलय की, लग्नाचा सिझन संपला का? असा मजेशीर सवाल तिने उपस्थित केला आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनीही भन्नाट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यासोबतच तिच्या फोटोचे कौतुकही केले. भाग्यश्री या फोटोत खूपच छान दिसत आहे. ती फोटोत एकदम साऊथ इंडियन लूकमध्ये दिसत आहे. तिने यावर साजेशी हेअरस्टाईल आणि ज्वेलरी परिधान केली आहे. हलकासा मेकअप आणि मस्त हेअरस्टाईल यामुळे ती खूपच गोड दिसत आहे. भाग्यश्रीचा हा फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.

कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास स्टार प्रवाहवर मागील वर्षी गणेशोत्सवामध्ये ‘देवा श्री गणेशा’ ही ११ भागांची बिगबजेट मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या मालिकेमध्ये भाग्यश्रीने पार्वतीची भूमिका साकारली होती. तिचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. मागील काही दिवसांपूर्वीच तिने तेलुगू चित्रपट ‘चिकती गदीलो चिताकोटुडू’ या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे. त्याआधी तिने ‘काय रे रास्कला’ या बिग बॅनर सिनेमाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. यानंतर ती ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ या चित्रपटात दिसली होती. भाग्यश्री लवकरच तमीळ चित्रपटात झळकणार आहे.या चित्रपटात ती बॅडमिंटनपटूची भूमिका साकारताना दिसणार आहे. भाग्यश्री प्रत्येक लूकमध्ये खूप सुंदर दिसते. तिच्या अदा या प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या असतात.