बॉलीवूडमधील एके काळच्या या टॉप अभिनेत्रीचा बदलला लुक; चित्रपटांपासून दूर जगतेय आरामदायक जीवन / फोटो इन्स्टाग्रामवरून साभार

बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींनी आपल्या करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असताना लग्न केले आणि त्यानंतर त्यापैकी काही अभिनेत्रींनी आपल्या चित्रपटातील करिअरला रामराम ठोकला. सध्या या अभिनेत्री बॉलीवूडपासून दूर असून कोणी व्यवसायात व्यग्र आहेत तर कोणी आरामदायक जीवन जगत आहेत. अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, नम्रता शिरोडकर. दक्षिणेतील चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार महेश बाबू याच्याशी लग्न केल्यानंतर या प्रसिद्ध मॉडेल अभिनेत्रीने स्वतःला बॉलीवूडपासून लांब ठेवले. ही अभिनेत्री आपला 49 वा वाढदिवस साजरा करत आहे यानिमित्ताने जाणून घेऊ तिच्याविषयीची रंजक माहिती.

अभिनेत्री नम्रता शिरोडकर ही बॉलीवूडमधील 90 च्या दशकातील प्रसिद्ध मॉडेल, अभिनेत्री होती. तिचा जन्म 22 जानेवारी 1972 मध्ये मुंबईत झाला. आपल्या चित्रपटातील करिअरमध्ये तिने अनेक चांगल्या चित्रपटांतून भूमिका केल्या. एका चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान, दक्षिणेतील सुपरस्टार महेश बाबू याच्याशी तिची भेट झाली आणि पहिल्याच भेटीत दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर दोघांनी लग्नही केले. करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असूनही या अभिनेत्रीने लग्नानंतर चित्रपटांतून काम करणे थांबवून स्वतःला बॉलीवूडपासून लांब ठेवले.

सलमान खान आणि ट्विंकल खन्ना यांच्याबरोबर ‘जब प्यार किसीसे होता है’ या फिल्ममध्ये तिने काम केले जी तिची डेब्यू फिल्म होती. ही फिल्म फ्लॉप ठरल्यानंतरही नम्रताकडे चित्रपटांचे प्रस्ताव येत होते. या फिल्मनंतर तिने ‘वामसी’ या तेलुगू चित्रपटात काम केले. ज्यात तिच्यासोबत मुख्य भूमिकेत सुपरस्टार महेश बाबू होता. ही त्याची डेब्यू फिल्म होती. तिने ‘कच्चे धागे’, ‘वास्तव’, ‘पुकार’, ‘दिल विल प्यार व्यार’, ‘हिरो हिंदुस्तानी’, ‘प्राण जाए पर शान न जाए’, ‘अलबेला’ हे चित्रपट केले. वर्ष 2000 मध्ये ‘वामसी’ चित्रपटावेळी महेश बाबू आणि नम्रता यांची प्रथम भेट झाली आणि दोघांमध्ये जवळीक वाढू लागली. शुटिंग पूर्ण होईपर्यंत दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पुढे 4 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 2005 मध्ये दोघांनी लग्न केले. दोघांना दोन मुले आहेत.

चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी नम्रता शिरोडकर हिने 1993 मध्ये ‘फेमिना मिस इंडिया’ हा किताब जिंकला होता. ही मॉडेल अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटांपासून लांब असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असून सोशल मीडियावर एक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर सतत फोटो शेअर करत असते. चित्रपटांपासून लांब असलेली ही अभिनेत्री आता पहिल्यापेक्षा थोडी वेगळी दिसत असून तिचा लुक बदलला असला तरी सौंदर्याच्या बाबतीत ती आजही अनेक हिरोइनला टक्कर देऊ शकते.

see in pics actress namrata shirodkar then and now look