अभिनेत्री दिपाली सय्यद आणि नवविवाहित जोडप अभिनेत्री मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा (फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार)

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक ही मंगळवारी इंटरनॅशनल बॉक्सर प्रदीप खरेरासोबत विवाह बंधनात अडकली आहे. त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाबाबतच्या चर्चा चांगल्याच रंगत होत्या. मंगळवारी अखेर दोघेही लग्नाच्या बेडीत अडकले असून त्यांनी त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. या कपलवर मनोरंजन विश्वातूनही शुभेच्छांचा वर्षाव होताना पहायला मिळत आहे. या सेलिब्रिटींपैकी मानसीची जवळची मैत्रीण अभिनेत्री दिपाली सय्यदने या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. दिपालीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत तिला लग्नाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

दिपालीने इन्स्टाग्रामवर मानसीसोबतचा सुंदर फोटो शेअर केला आहे. दिपालीने फोटो शेअर करत पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, प्रिय मनू,आज तुझं लग्न झालं, तुम्हा दोघांची प्रेमगाठ अनेक जन्मासाठी बांधली गेली आणि तुमच्या नवीन पती पत्नीच्या नात्याला सुरुवात झाली, तुमचं हे पवित्र नातं असच फुलत राहावं सदैव तुमच्यात प्रेम वाढत राहावं. मी तुम्हा दोघांनाही वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा देते. या दिवसाचा आनंद कायम आणि शेवटच्या श्वासापर्यंत राहील. दोघांनाही लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा ! अशा शब्दांमधेय दिपालीने या दांम्पत्याला लग्नाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे. मानसी आणि दिपालीच्या चाहत्यांनी यावर भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत.

कोरोनाचे संकट अजूनही टळले नसल्याने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्यांचा हा लग्नसोहळा पार पडला. मानसीचा नवरा प्रदीप हा  बॉक्सर असून तो अभिनेता आणि मॉडेलसुद्धा आहे. जवळपास एक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मानसीने मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये इन्स्टाग्रामवर प्रदीपसोबतचे फोटो पोस्ट करत त्याच्यासोबतच्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये त्यांचा साखरपुडा झाला. याबाबतही मानसीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. मानसीने ‘वाट बघतोय रिक्षावाला’ या गाण्याद्वारे रसिकांच्या ह्रदयात खरे स्थान मिळवले. तिचे हे गाणे खूपच लोकप्रिय झाले.  मूळची पुण्याची असलेल्या मानसीने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मानसी नृत्यकौशल्यात चांगलीच निपुण आहे.