'छपाक' हा मेघना गुलजार यांचा सिनेमा दीपिकाचा शेवटचा प्रदर्शित झालेला सिनेमा होता.

बॉलिवूडची मस्तानी, राणी दीपिका पदुकोण नेहमीच आपल्या ऑसम लूक्समुळे चर्चेत असते. पारंपरिक लूक्स आणि मॉडर्न लूक्स दोन्हीमध्ये दीपिका नेहमीच सुंदर दिसते. कान्स फिल्म फेस्टिव्हल असो किंवा फिल्मफेअर अवॉर्ड शो असो सर्वत्र दीपिका आपल्या लूक्सनी आपल्या चाहत्यांना घायाळ करते. ‘छपाक’ हा मेघना गुलजार यांचा सिनेमा दीपिकाचा शेवटचा प्रदर्शित झालेला सिनेमा होता. ह्या सिनेमात तिने ऍसिड अटॅक पीडितेची भूमिका साकारली होती. आता लवकरच दीपिकाचे अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये दीपिका सध्या व्यग्र आहे. आपल्या व्यग्र शेड्यूलमधून वेळात वेळ काढून ती इन्स्टाग्रामवर आपले फोटो शेअर करत असते.

नुकताच तिने आपल्या इंस्टाग्रामवर आपला ब्लॅक अँड व्हाईट असा एक फोटो शेअर केला आहे. ती फोटोशूटमध्ये व्यग्र आहे, असे त्या फोटोत दिसून येते. या फोटोवर तिच्या नवऱ्याने म्हणजे रणवीर सिंगने ‘हॉट’ अशी कमेंट केली आहे. नुकताच दीपिकाने शकुन बत्रा यांच्या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केले आहे. या सिनेमामध्ये तिच्यासोबत सिद्धार्थ चतुर्वेदी, अनन्या पांडे दिसून येणार आहेत. त्याचप्रमाणे शाहरुख खानसोबतच्या पठाण या सिनेमांमध्ये देखील दीपिका दिसणार आहे.

बाहुबली फेम ॲक्टर प्रभास याच्या सोबत ती नागा अश्विन यांच्या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाची घोषणा खुद्द प्रभासने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून केली होती. बॉलीवूडमध्ये दीपिकाने आपले स्थान बळकट केले आहेच. आता ती हॉलिवूडमध्ये देखील करिअर करण्यासाठी प्रयत्नशील आहे. विन डिझेल सोबत तिची प्रमुख भूमिका असलेला सिनेमा खूप चर्चेचा विषय ठरला होता. ह्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर म्हणावे तसे यश जरी मिळाले नसले तरी हॉलिवूड मधील एन्ट्रीचा दीपिकाचा मार्ग सुकर मात्र झालेला आहे. द इंटर्न ह्या सुपरहिट सिनेमाच्या हिंदी रिमेक मध्ये दीपिका प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.