दीपिका पादुकोण (फोटो - सोशल मीडियावरून साभार)

काही महिन्यापूर्वी अशा बातम्या समोर आल्या होत्या की, निर्माते मधु मंटेना महाभारताच्या कथानकावर आधारित एक चित्रपट करत आहेत. यामध्ये दीपिका पादुकोणला द्रौपदीच्या भूमिकेसाठी घेण्यात आले होते. तसेच दीपिकानेसुद्धा या गोष्टीची पुष्टी केली होती की, ती या चित्रपटात काम करणार आहे. यादरम्यान आता अशा बातम्या समोर येत आहेत की, दीपिकाचा हा महत्त्वकांक्षी चित्रपट सध्या करण्यात येणार नाही. चित्रपटासाठी दिग्दर्शक मिळत नसल्यामुळे हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे.

चित्रपटाबाबत समोर येत असलेल्या बातम्यांनुसार असे सांगितले जात आहे की, या चित्रपटासाठी अनेक लोक उत्साहित होते. मात्र, मागील दोन वर्षापासून या चित्रपटासाठी दिग्दर्शकाची निवड होऊ शकली नाही. तसेच या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी अनेक मोठमोठ्या दिग्दर्शकांचे नाव फायनल करण्यात आले होते. यामध्ये विशाल भारद्वाज यांचे नावसुद्धा सामिल होते. मात्र, पुढे काही होऊ शकले नाही. आताही दिग्दर्शक मिळत नसल्यामुळे हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे.

दीपिकाचा मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘छपाक’ या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच घोषणा करण्यात आली होती की, दीपिका महाभारतावर आधारित एका चित्रपटात द्रौपदीची भूमिका साकारणार आहे. त्यानंतर या चित्रपटाबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. तसेच दीपिका किंवा निर्माता मधु मंटेना यांच्याकडूनही कोणतीही माहिती मिळाली नाही.

दीपिकाच्या सध्याच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास दीर्घकाळानंतर ती शाहरूख खानच्या ‘पठान’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच शकुन बत्रा यांच्याही एका चित्रपटात ती दिसणार आहे. नुकतीच दीपिकाने ह्रतिक रोशनसोबत ‘फायटर’ हा चित्रपट साईन केला आहे. याशिवाय काही दिवसापूर्वी दीपिकाच्या आणखी एका चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन करणार आणि दीपिकासोबत यामध्ये बाहुबली फेम अभिनेता प्रभास मुख्य भूमिकेत दिसणार आहे.