'वन टू थ्री फोर, गेट ऑन द डान्स फ्लोर' हे गाणं आठवतंय का? हो हो तुम्ही बरोबर ओळखलत. या गाण्यात जी अभिनेत्री आपल्या डान्स परफॉर्मन्सने प्रेक्षकांना घायाळ करते तीच आहे प्रियामणी.

मनोज वाजपेयीच्या फॅमिली मॅन २ या सीरिजची चाहते उत्सुकतेने वाट बघत होते. १४ जून रोजी सिरिज प्रदर्शित झाली. आणि अख्ख्या भारताला या सीरिजने पुन्हा एकदा प्रेमात पडायला भाग पाडले. मनोज वाजपेयी, समांथा आणि प्रियामणी या लीड कलाकारांच्या उत्कृष्ट कामाचे सर्वत्र कौतुकच होत आहे. या सीरिजमध्ये मनोज वाजपेयीच्या पत्नीचा रोल निभावणारी प्रियामणी आता तिच्या मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे.

तुम्हाला माहितीये का, प्रियामणीने याआधी देखील हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काम केले आहे. चेन्नई एक्स्प्रेस सिनेमा आठवतोय का? तुम्हाला त्यामधील ‘वन टू थ्री फोर, गेट ऑन द डान्स फ्लोर’ हे गाणं आठवतंय का? हो हो तुम्ही बरोबर ओळखलंत. या गाण्यात जी अभिनेत्री आपल्या डान्स परफॉर्मन्सने प्रेक्षकांना घायाळ करते तीच आहे प्रियामणी.

आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत प्रियामणीने मीडियासोबत एक खास गोष्ट शेअर केली आहे. वन टू थ्री फोर या गाण्याचे शूटिंग जवळपास पाच दिवस चालले हाेते. आणि शाहरुखसोबत काम करण्याचा अनुभव म्हणजे सर्वोत्कृष्ट होता असेही तिने आपल्या मुलाखतीत सांगितले आहे. तसेच ती म्हणाली की, शूटिंग दरम्यान आम्ही रिकाम्या वेळेत शाहरुखच्या आयपॅडवर कौन बनेगा करोडपती खेळायचो. तेव्हा शाहरूखने तिला ३०० रुपये दिले होते. आणि ते ३०० रुपये तिने आजही जपून ठेवले आहेत.

हिंदी चित्रपटसृष्टीमधील जवळपास सर्व कलाकारांचे स्वप्न असते की शाहरुखसोबत काम करायचे. आणि प्रियामणीचे हे स्वप्न पूर्ण झालेले आहे त्यामुळे ही आठवण तिच्यासाठी खूप खास आहे यात काही शंकाच नाही. दीपिका पदुकोणसोबत शाहरुख आता आगामी पठाण या सिनेमामध्ये दिसणार आहे. प्रियामणीच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाल्यास ती अजय देवगणच्या मैदान या सिनेमामध्ये दिसणार आहे. याआधी ती मणिरत्नम यांच्या रावण सिनेमामध्ये देखील दिसली होती.