१९४२ ए लव्ह स्टोरी या सिनेमाला त्यावर्षीचे बरेच फिल्मफेअर अवॉर्ड्स देखील मिळाले होते.

१९४२ ए लव्ह स्टोरी या सिनेमातील ‘कुछ ना कहो..कुछ भी ना कहो’ हे आजही साऱ्या प्रेमवीरांचे आवडते गाणे आहे. अगदी शांत आणि प्रचंड रोमँटिक असणारं हे गाणं मनीषा कोईराला आणि अनिल कपूर यांच्यावर चित्रीत करण्यात आले होते. हा सिनेमा विधू विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शित केला होता. तर तेच या सिनेमाचे निर्माते देखील होते. या चित्रपटामध्ये अनिल कपूर, अनुपम खेर, मनिषा कोईराला आणि जॅकी श्रॉफ असे मोठमोठे स्टारकास्ट होते.

१९४२ हा तो काळ होता जेव्हा इंग्रजांच्या भारतातील राजवटीला धक्का बसला होता. आणि इंग्रज भारतातून जाण्यास सुरुवात झाली होती. राजकीय आणि सामाजिक पातळीवर बराच गोंधळ आणि असंतोष माजला होता. या अशा काळामध्येही दोन प्रेमवीराचं प्रेम कसे फुलत जाते. यावर आधारित हा सिनेमा होता. आणि हा सिनेमा प्रचंड हिट ठरला होता. या सिनेमाच्या सेटवरुन फराहने काही आठवणी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केल्या आहेत. या फोटोमध्ये मनिषा कोईराला, विधू विनोद चोप्रा आणि फराह एकत्र दिसत आहेत. मंडे मेमरीज असे कॅप्शन देत तिने हा फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

या सिनेमाला त्यावर्षीचे बरेच फिल्मफेअर अवॉर्ड्स देखील मिळाले होते. कविता कृष्णमूर्ती आणि कुमार सानू या दोघांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा अवॉर्ड  मिळाला होता. त्याचप्रमाणे राहुल देव बर्मन यांना सर्वोत्कृष्ट संगीतकार हा अवॉर्ड मिळाला होता. या सिनेमाच्या प्रदर्शनानंतर काही काळातच राहुल देव बर्मन यांचे निधन झाले होते. जॅकी श्रॉफ याला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. तर जावेद अख्तर यांना सर्वोत्कृष्ट गीतकार हा पुरस्कार मिळाला होता. असे बरेच पुरस्कार या सिनेमाने आपल्या नावावर करून घेतले होते.