या चित्रपटात ट्रिपल नव्हे तर डबल रोलमध्ये दिसणार हा अभिनेता; भूमिकेसाठी 12 किलोने वजन केले कमी / फोटो इन्स्टाग्रामवरून साभार

चित्रपटामधील भूमिका जिवंत करण्यासाठी कलाकार त्यासाठी खूप मेहनत घेतात. कधी एखाद्या भूमिकेसाठी कोणाला वजन वाढवावे लागते तर कधी कमी करावे लागते. कधी केस लांब वाढवावे लागतात तर कधी पूर्ण टक्कलही करावे लागते. पण जर एखाद्या चित्रपटात डबल रोल करायचा असेल तर वेगवेगळी दोन रूपे दाखविण्यासाठी त्यांना कसरत करावी लागते. जसे की ‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटात अभिनेता जॉन अब्राहम समाजसेवक आणि अधिकारी अशा दोन भूमिका साकारत असून समाजसेवकाच्या भूमिकेसाठी त्याने त्याचे वजन कमी केले. तर अधिकाऱ्याच्या भूमिकेतून त्याचा एक्शन अवतार पाहायला मिळणार आहे.

जॉन अब्राहम त्याच्या ‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटासाठी खूपच उत्साही असून या चित्रपटात तो तिहेरी भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात होते. पण सेटवरील सूत्रांच्या माहितीनुसार यात तो डबल रोल करत आहे. त्यापैकी एक भूमिका ही समाजसेवकाची आहे, तर दुसऱ्या भूमिकेत तो शत्रूवर तुटून पडताना दिसणार आहे. म्हणजेच सत्याग्रह आणि हिंसा अशा दोन्ही मार्गांनी तो भ्रष्टाचार करणाऱ्यांना धडा शिकवताना दिसणार आहे.

या चित्रपटातील भूमिकेसाठी जॉनने त्याचे वजन 12 किलोने कमी केले आहे. पहिल्या ‘सत्यमेव जयते’मध्ये जॉनने ट्रकचा टायर फाडला होता, तर आता ‘सत्यमेव जयते 2’मध्ये तो ट्रक आणि ट्रॅक्टरसमवेत एक्शन सीन करताना दिसणार आहे. 50 कोंबड्यांशी त्याला झुंजवले गेले आहे. क्लायमॅक्सच्या एक्शन सीनची लांबीही वाढविण्यात आली असून त्याचे शुटिंग गेल्या पंधरवड्यापासून मुंबईमध्ये सुरू असून आज ते पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे. लखनऊमध्येही अनेक एक्शन सीन शूट केले गेले आहेत. या चित्रपटात जॉनला लीन फिजिकमध्ये पाहून प्रेक्षक खुश असून त्याचा हा लुक प्रेक्षकांना आकर्षित करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

एक्शनच्या जोडीला जॉनच्या तोंडी तितकेच दमदार डायलॉगही असणार आहेत. मिलाप झवेरी यांनी हे डायलॉग लिहिले आहेत. ही फिल्म या वर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित केली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

for satyamev jayate 2 john abraham reduced his weight