अभिनेता हेमंत ढोमे आणि अभिनेत्री क्षिती जोगच्या घरी अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार)

मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वांचे लाडके कपल अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांची जोडी चांगलीच लोकप्रिय आहे. हे दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. सध्या त्यांची जोरदार लगीनघाई सुरु असून, ते त्यांच्या केळवणाचे फोटो शेअर करत आहेत. या दोघांचाही गेल्यावर्षी साखरपुडा पार पडला होता. आता या नवीन वर्षात हे दोघेही लग्न करणार आहेत. नुकताच त्यांच्या एका केळवणाचा फोटो समोर आला आहे. मराठीतील सुप्रिसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि त्याची पत्नी अभिनेत्री क्षिती जोग यांनी या दोघांना केळवणसाठी त्यांच्या घरी बोलावले होते. सिद्धार्थ आणि मिताली या दोघांनी हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. मिताली सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेतील कस्तुरी या भूमिकेद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकत आहे.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर ही गोड जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे लग्नाची तयारी सुरु होत असतानाच दोघाचे केळवण जेवणाचाकार्यक्रम जोरात सुरु आहेत. यात मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी आणि सिद्धार्थ – मितालीच्या मित्रमैत्रिणींनी त्यांच्यासाठी केळवणाचा कार्यक्रम ठेवला होता. आता नुकतेच हेमंत आणि क्षितीच्या घरी हे कपल केळवणासाठी पोहचले होते. दोघांनीही इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याची माहिती दिली. सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, पाटलांच्या घरचं जेवण काही औरच. खूप टिप्स आणि गायडन्सने भरलेलं केळवण. खूप खरं आणि खूप जास्त प्रेम..! अशा शब्दांमध्ये त्याने ही पोस्ट शेअर केली आहे. या फोटोंमध्ये सिद्धार्थ आणि मिताली खूप गोड दिसत आहेत. फोटोमध्ये क्षिती त्यांचे औक्षण करताना दिसत आहे.

अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि अभिनेत्री क्षिति जोग यांनी सिद्धार्थ-मितालीसाठी केळवण जेवणाचे आयोजन केले होते. यावेळी खास जेवणाचा बेत ही त्यांनी केला होता. हे दोघे ही सध्या त्यांच्या केळवण जेवणाच्या कार्यक्रमांचा आनंद लुटताना दिसत आहेत. मागील काही दिवसांपूर्वीच या दोघांनी अभिनेत्री स्मिता तांबेच्या घरी केळवणासाठी हजेरी लावली होती.