जॅकलीन फर्नांडिस (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार)

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला बॉलिवूडमध्ये आपले सौंदर्य आणि फिटनेससाठी ओळखले जाते. सोशल मीडियावर सक्रिय राहत ती नेहमी आपले सुंदर फोटोंसोबत वर्कआऊटचे व्हिडिओसुद्धा शेअर करते. नुकतीच जॅकलीनने तिचे काही क्लोजअप फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत. मात्र, यावेळी जॅकलीनकडून एक चूक घडली. तिने फाटलेल्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत आणि चाहत्यांचे लक्ष या तिच्या ड्रेसकडे गेले. त्यानंतर अनेक लोकांनी तिच्या या फाटक्या ड्रेसमुळे तिला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.

जॅकलीनने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर तिचे दोन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती अंथरूणावर झोपलेली असून सेल्फी घेताना दिसून येत आहे. तसेच तिचे केसही मोकळे सोडलेले आहेत. यामध्ये तिने सिल्वलेस टॉप घातलेला आहे. व्हाईट कलरच्या टॉपला नेटचे डिझाईन करण्यात आले आहे. मात्र, या डिझाईनच्या एका भागात मोठे छिद्र दिसत आहे. हे चाहत्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी कमेंट करत प्रश्नांची सरबत्ती सुरु केली.

अनेक नेटक-यांनी जॅकलीनच्या या फोटोवर कमेंट करत तिला विचारले की, मॅडम तुमचा ड्रेस खरंच फाटलेला आहे की ही कोणती फॅशन आहे. तर अनेकांनी तिला तिचा ड्रेस फाटलेला असल्याचे सांगितले. एकाने तिच्या या फोटोवर कमेंट करत लिहिले की, मॅडम तुम्ही पोस्ट शेअर करण्याआधी एकदा चेक करायचे होते. तुमचा ड्रेस एका बाजूने खराब दिसत आहे. मात्र, तरीही तुम्ही खूपच सुंदर दिसत आहात.

जॅकलीनच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास लवकरच ती सलमान खानसोबत ‘किक २’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच ती ‘भूत पुलिस’ या चित्रपटातही दिसणार आहे. यामध्ये तिच्यासोबत सैफ अली खान, अर्जुन कपूर, जावेद जाफरी आणि यामी गौतम मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय रोहित शेट्टीने आपल्या आगामी ‘सर्कस’ या चित्रपटासाठीही जॅकलीनना साईन केले आहे. यामध्ये रणवीर सिंह आणि पूजा हेगडेसुद्धा मुख्य भूमिकेत असणार आहेत.