करणचा 'कॉफी विथ करण' हा शो देखील खूपच प्रसिद्ध आहे.

निर्माता करण जोहर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतो. नेपोटिझम किंग म्हणून ओळखला जाणारा करण इंस्टाग्रामवर बराच सक्रिय असतो. इंस्टाग्रामवरील विविध पोस्टसाठीही तो चर्चेत असतोच असतो. पण तो आणखी एका कारणामुळे सर्वात जास्त चर्चेत असतो. ती गोष्ट म्हणजे त्याची सेल्फी घेण्याची स्टाईल आणि त्याचा पाऊट. कोरोनामुळे इन्स्टाग्रामवरून काही काळासाठी त्याने ब्रेक घेतला होता. पण तो आपल्या एपिक सेल्फी आणि पाऊट मधील फोटोंमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकताच त्याने आपला एक सेल्फी आपल्या इन्स्टाग्राम  अकाऊंटवर शेअर केला आहे.

करणचा ‘कॉफी विथ करण’ हा शो देखील खूपच प्रसिद्ध आहे. मोठमोठ्या सेलिब्रेटी या शो मध्ये येतात. कोण कोणाला डेट करतय? कोण कोणाला लाइक करतंय? ह्या सर्व चर्चा या शोमध्ये होतात. त्यामुळे बॉलीवूड गॉसिप प्रेमी हा शो खूप आवडीने बघतात. एक यशस्वी निर्माता असण्यासोबतच करण एक उत्कृष्ट दिग्दर्शकदेखील आहे. त्याने दिग्दर्शन केलेले कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम हे सिनेमे सुपरहिट झाले होते. त्यानंतर नुकताच आलेला ‘ऐ दिल है मुश्किल’ या सिनेमाचे  दिग्दर्शनदेखील करणनेच केले होते.

विक्रम बत्रा यांची प्रेम कहाणी आणि त्यांचे देशाविषयीचे प्रेम याची कथा सांगणारा ‘शेरशाह’ मूव्ही नुकताच प्रदर्शित झालाय. हा मूव्हीवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होताना दिसून येतोय. या सिनेमाचा निर्माता देखील करणच होता. त्यात करण विरूद्ध कंगना अशी दुश्मनी असताना, कंगनाचे चाहते देखील करण जोहरवर कौतुकाचा वर्षाव करताना दिसून येत आहेत.