अभिनेत्री कतरिना कैफ (फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार)

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून लांब आहे, मात्र ती लवकरच तिच्या आगामी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कतरिना सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. ती सतत तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांकरता शेअर करत असते. फिटनेस आणि डान्सच्या बाबतीत कतरिना चांगलीच जागरुक आणि तितकीच निपुण आहे. नुकताच तिने तिचा एक फिटनेस करतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या या फिटनेस व्हिडिओचे चाहत्यांनी चांगलेच कौतुक केले आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या फिटनेस ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली पायांचा व्यायाम करताना दिसत आहे.

कतरिनाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसतेयं की, कतरिना जिममध्ये तिच्या पायांचा व्यायाम करत आहे. तिच्या फिटनेस ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली ती पिलाटे सेशनचे वर्कआऊट करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिलयं की, मी जिममध्ये वर्कआऊट करायला प्राधान्य देते. परंतु, मला हे समजले की आपण पिलाटे सेशनच्या माध्यमातून ही वर्कआऊट करु शकतो. यास्मिन कराचीवाला पिलाटे सेशनच्या दरम्यान माझ्या शरिराच्या प्रत्येक अवयवावर लक्ष देते अशा शब्दांमध्ये तिने तिच्या फिटनेस ट्रेनर असलेल्या कराचीवाला हिचे ही कौतुक केले आहे. तिच्या या फिटनेस व्हिडिओवर चाहत्यांनीही भरभरुन प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे.

कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास कतरिना लवकरच दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या आगामी ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात दिसणार आहे. ती बऱ्याच दिवसांनी अभिनेता अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे कतरिना आणि अक्षयची हिट जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय ती एक्सेल मूव्हीजच्या आगामी ‘फोन भूत’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. यामध्ये तिच्यासोबत अभिनेता ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत आहेत. सोबतच अली अब्बास जफर यांच्या ‘सुपरहिरो’ सीरिजमध्येही ती दिसणार आहे.