कियारा अडवाणी आणि विकी कौशल (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार)

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीजवळ सध्या अनेक प्रोजेक्ट्समुळे फारच व्यग्र आहे. नुकतीच ती आपल्या आगामी ‘भुल भुलैया २’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मनालीला गेली. लवकरच ती चित्रीकरण पूर्ण करून मुंबईला परतणार आहे. यादरम्यान आता कियाराबाबत अशा बातमी समोर येत आहे की, लवकरच ती दिग्दर्शक शशांक खेतान यांच्या ‘मिस्टर लेले’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती विकी कौशलसोबत रोमान्स करताना दिसून येणार आहे.

शशांक खैतान यांनी वर्षभरापूर्वी वरूण धवनला मुख्य भूमिकेत घेऊन ‘मिस्टर लेले’ या चित्रपटाची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर वरूणच्या जागी विकी कौशलला घेण्यात आले. मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणुमुळे परिस्थिती योग्य नसल्याने चित्रीकरण थांबवण्यात आले होते. तर आता सर्व गोष्टी सुरळितपणे सुरु झाल्याने लवकरच चित्रीकरणासही सुरुवात करण्यात येणार आहे. तर यावर्षाच्या अखेरपर्यंत चित्रपट पूर्ण करण्याची योजना आहे.

कियारा ‘लस्ट स्टोरीज’ या वेबसीरीजनंतर पुन्हा एकदा या चित्रपटाद्वारे विकी कौशलसोबत काम करताना दिसणार आहे. सध्या कियारा आणि विकी दोघेही आपापल्या कामात व्यग्र आहेत. त्यामुळे असे सांगण्यात येत आहे की, कियारा ‘भुल भुलैया २’ तर विकी ‘अश्वत्थामा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर ‘मिस्टर लेले’च्या चित्रीकरणास सुरुवात करणार.

कियाराच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास तिने २०१४ साली आलेल्या ‘फगली’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र, ‘एमएस धोनी – द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटामुळे तिला सिनेसृष्टीत ओळख मिळाली.त्यानंतर २०१९ साली आलेल्या शाहिद कपूरसोबत ती ‘कबीर सिंह’ या चित्रपटात दिसली. हा चित्रपट तिच्यासाठी फारच लकी ठरला. या चित्रपटामुळे तिला फार लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ती ‘गुड न्यूज’ आणि ‘लक्ष्मी’ या चित्रपटात दिसली. नुकतीच तिचा ‘इंदु की जवानी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. तर सध्या कियाराजवळ ‘भुल भुलैया २’ शिवाय ‘जुग-जुग जियो’ आणि ‘शेरशाह’ यासारखे चित्रपट आहेत.