या कारणामुळे नाराज झालेल्या जया बच्चन यांना शाहरुख खानला मारायची होती थप्पड़ / फोटो इन्स्टाग्रामवरून साभार

बॉलिवूडमध्ये किंग म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खान याने स्वतःच्या मेहनतीवर चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान आणि ओळख निर्माण केली आहे. त्याच्या नावावर अनेक हिट चित्रपट आहेत. त्याच्यासोबत काम करण्याची चित्रपटसृष्टीत प्रत्येकाची इच्छा असते. शाहरुख वेगवेगळ्या कारणांनी सातत्याने चर्चेत असतो. त्याने अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यासोबतही काही चित्रपट केले आहेत. ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटात त्याने त्यांच्या मुलाची भूमिका केली होती. त्याच्यावर त्यांचे खूप प्रेम दाखविले आहे. पण, वास्तवात एका कारणामुळे जया बच्चन यांना शाहरुखला थप्पड मारायची होती. मध्यंतरी त्यांनीच आपण त्याला थप्पड मारू इच्छितो, असे म्हटले होते.

शाहरुखने बॉलिवूडमधील बहुतेक सर्व आघाडीच्या अभिनेत्रींसोबत काम केले आहे. काही हिरोइनसोबत त्याने अनेक चित्रपटही केले आहेत. ऐश्वर्यासोबतही त्याने ‘जोश’, ‘मोहब्बते’, ‘देवदास’ यांसारखे चित्रपट केले. ते सुपरहिटही झाले. त्यावेळी सलमान खान ऐश्वर्याच्या प्रेमात पडला होता त्यामुळे ऐश्वर्याचे शाहरुखसोबत काम करणे सलमानला आवडले नव्हते. त्यावरून त्याने एकदा चित्रपटाच्या सेटवर जाऊन शाहरुखला बरेच काही सुनावलेही होते. त्यानंतर ऐश्वर्याने ती फिल्म सोडलीच पण, शाहरुखही ऐश्वर्याबाबत त्यावेळी काहीतरी उलटसुलट बोलला होता. दरम्यानच्या काळात ऐश्वर्याचे लग्न अभिषेक बच्चन याच्याशी झाले. ऐश्वर्या राय, बच्चन कुटुंबाची सून झाली होती.

त्यामुळे ऐश्वर्याबाबतचे शाहरुखचे उलटसुलट बोलणे सासू जया बच्चन यांना मुळीच आवडले नव्हते आणि त्या चिडल्या होत्या व याच कारणावरून शाहरुखला थप्पड मारण्याबाबत त्या बोलल्या होत्या. सलमान आणि शाहरुख यांच्या भांडणानंतर एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत जया बच्चन यांनी शाहरुखबद्दल राग व्यक्त केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, ‘हो मी तसे केले असते. अर्थात मला आतापर्यंत त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली नाही. या वादासंदर्भात मी लवकरच त्यांच्याशी बोलणार आहे. मी त्यांना तशीच थप्पड मारेन जशी मी माझ्या मुलाला मारते. त्यांच्याशी माझे नाते गहिरे आहे.’

when jaya bachchan wanted to slap shah rukh khan for