पुण्यातील मॅरियट हॉटेलमध्ये शाही विवाह सोहळ्यात गौरवी आणि अतुल भोसले विवाहबद्ध झाले होते.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची मुले रितेश देशमुख, अमित देशमुख आणि धीरज देशमुख तुम्हाला माहीत असतीलच. पण त्यांच्या मुलीबद्दल तुम्हाला काही माहीत आहे का? त्यांच्या मुलीचे नाव आहे गौरवी देशमुख. पुण्यातील मॅरियट हॉटेलमध्ये शाही विवाह सोहळ्यात गौरवी आणि अतुल भोसले विवाहबद्ध झाले होते. ह्या विवाह सोहळ्यात महाराष्ट्रातील बऱ्याच मोठ्या राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती.

रितेश देशमुखने फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपले करिअर केले. त्यामुळे तो सतत मीडियामध्ये चर्चेचा विषय असतो. त्याचप्रमाणे त्याचा भाऊ अमित देशमुख देखील राजकारणामध्ये सक्रिय आहे. त्यामुळे तो देखील वरचेवर मीडियामध्ये चर्चेत असतो. पण यांची बहीण गौरवी मात्र मीडिया टेन्शनपासून खूप दूर आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर रितेशने आपल्या बहिणीच्या वाढदिवसानिमित्त एक स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. आणि गौरवी देशमुख सोबतचा एक फोटो देखील शेअर केला आहे.

‘अतिशय प्रेमळ, काळजी घेणारी, नेहमी हसतमुख असणारी, आमच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.’ असे कॅप्शन देत त्याने आपल्या बहिणीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. रितेश देशमुखच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, तो सोनाक्षी सिन्हासोबत काकुडा या सिनेमामध्ये दिसणार आहे. या सिनेमाचे शूटिंगदेखील चालू झाले आहे. रितेश इन्स्टाग्रामवर बराच सक्रिय असतो. बायको जेनेलियासोबत तो बरेच विनोदी रील बनवत असतो. इन्स्टाग्राम प्रेमी आणि नेटकऱ्यांसाठी रितेश आणि जेनेलियाचे रील्स ही एक एक्सायटिंग गोष्ट असते. त्यांनी रील शेअर केल्या केल्या काही कालावधीच्या अवधीतच प्रचंड व्हायरल होतो.