‘लूप लपेटा’या सिनेमात सध्याची आघाडीची अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.(फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार )

जर्मन चित्रपट ‘रन लोला रनचा हिंदी रिमेक ‘लूप लपेटाकोरोना विषाणू संसर्गासाठी विशेषत्वाने तयार केलेल्या ‘कोविड -१’ विमा योजनेचा अवलंब करणारा हिंदी सिनेसृष्टीतील पहिला चित्रपट असू शकतो. या सिनेमात सध्याची आघाडीची अभिनेत्री तापसी पन्नू आणि ताहिर राज भसीन हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

‘कोविड -१ इन्शुरन्स’ हा इतर अपघाती विम्यांसारखाचा आहे. शूटिंगवेळी जर एखाद्या कर्मचाऱ्याला किंव्हा सदस्याला कोरोनाची लागण झाली तर अशा परिस्थितीत शूटिंग खंडित करण्याची वेळ उद्भवू शकते आणि निर्मात्यांना आर्थिक नुकसनाला सामोरे जावे लागू शकते.

पण या विम्याचा साह्याने निर्मात्यांना दिलासा मिळू शकतो.

या चित्रपटाचे निर्माते अतुल कसबेकर एका मुलाखतीत म्हणाले की, या चित्रपटाचे शूटिंग एप्रिल आणि मे महिन्यात मुंबई आणि गोव्यात होणार होते. पण कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आणि देशभर लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे या चित्रपटाचे काम थांबवावे लागले. आता या सिनेमाच्या आऊटडोअर शूटिंगसाठी नवीन तारखा काढल्या जात आहेत.

अतुल यांच्या म्हणण्यानुसार, या चित्रपटाचे शूटिंग ऑक्टोबर महिन्यात सुरू केले जाऊ शकते. हा एक थरारक आणि तितकाच विनोद चित्रपट असणार आहे. याची निर्मिती सोनी पिक्चर आणि एलिप्सिस एंटरटेनमेंट एकत्रितपणे करणार आहेत. पुढील वर्षी २९ जानेवारी प्रेक्षागृहात चित्रपट प्रदर्शित केला जाईल, असे सध्याचे नियोजन आहे.

‘रन लोला रन’ हा थरारपट १९९८ साली प्रदर्शित झाला होता. जर्मनीने या चित्रपटाला ७१ व्या ऑस्करसाठी निर्देशित केले होते.

‘रन लोला रन’ प्रमाणेच आमीर खानचा ‘लालसिंग चड्ढा’ हा सुद्धा टॉम हँक्सच्या फॉरेस्ट गंप या परदेशी चित्रपटाचा ऑफिशियल रिमेक या वर्षी प्रदर्शित होऊ शकतो.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *