अभिनेत्री भाग्यश्री तिच्या पतीसोबत (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार)

‘मैंने प्यार किया’ फेम अभिनेत्री भाग्यश्री सध्या चित्रपटापासून लांब असली तरी,  सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. याद्वारे ती अनेक पोस्ट शेअर करत चाहत्यांशी संपर्कात राहते. नुकतीच ती पती हिमालय दासानीसोबत काश्मिरमध्ये सुट्ट्या एन्जॉय करायला गेली होती. यादरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ती आता चाहत्यांशी शेअर करत आहे. तिचे हे फोटो पाहून बर्फाळ प्रदेशात भाग्यश्री पतीसोबत भरपूर एन्जॉय केल्याचे दिसून येत आहे. तसंच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने, आपल्यातील बालपण कधी हरवू नका, असेही चाहत्यांना सांगितले आहे.

भाग्यश्रीने आपल्या इन्स्टाग्राम हँडलद्वारे तिचे काश्मीरमधील फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहे. यामध्ये एका व्हिडिओत दिसत आहे की, ती बर्फाळ प्रदेशात पतीसोबत खूप मजामस्ती करत आहे. तसेच या व्हिडिओत ती खूपच खूश असल्याचेही दिसून येत आहे. व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले की, ‘आपल्यातील बालपण कधीही गमावू नका. माझ्या सर्व बालपणीच्या आठवणी आता पुन्हा जागृत होत आहेत’.

यापूर्वीही भाग्यश्रीने पतीसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये ती पतीसोबत श्रीदेवी आणि ऋषी कपूर यांच्या ‘चांदनी’ या चित्रपटातील गाणं रिक्रिएट करताना दिसून आली. व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले होते की, हे गाणं रिक्रिएट करण्यासाठी मला खूप वेळ पतीला मनवावे लागले. तसेच जोपर्यंत ते डान्स करायला तयार झाले नाही तोपर्यंत त्यांना त्रास देत राहिले. भाग्यश्रीने पुढे सांगितले की, जोपर्यंत हे आयुष्य जगता येते तोपर्यंत प्रत्येक क्षणाचा आनंद लुटा. काय माहीत उद्याचे आयुष्य असणार किंवा नाही’.

भाग्यश्रीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास लवकरच ती ‘थलायवी’ या चित्रपटात दिसणार आहे. तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून यामध्ये अभिनेत्री कंगना राणावत जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय बाहुबली फेम अभिनेता प्रभासच्या आगामी ‘राधेश्याम’ या चित्रपटातही भाग्यश्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे.