मकर संक्रातीनिमित्त मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार)

हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक असणारा मकर संक्रातीचा सण आज देशभरात उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. पंचांगानुसार जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यादिवशी मकर संक्रातीचा सण साजरा केला जातो. त्यानुसार दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारी रोजी हा सण साजरा करण्यात येते. त्याचप्रमाणे या सणानंतर हिवाळा ऋतु संपतो आणि नव्या पीकाची सुरुवात होते, असेही मानले जाते. मागील वर्षी कोरोना विषाणुमुळे सर्वांनाच कठिण काळाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे येणाऱ्या नव्या पिकाप्रमाणे यंदाचे वर्ष सर्वांच्याच जीवनात नवीन बहार घेऊन येईल, अशी अपेक्षा ठेवत सर्वजण एकमेकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत आहेत. सोबतच या दिवशी काळ्या रंगाची वस्त्रे परिधान केली जातात. काळ्या रंगाची वस्त्रे बाहेरची उष्णता शोषून घेऊन शरीराला उब देण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे या मकर संक्रांतीच्या निमित्ताने मराठी तारकांनीही आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर काळ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर करत आपल्या खास अंदाजात मकर संक्रातीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. टाकूया एक नजर यावर.

१. मोनालीसा बागल

अभिनेत्री मोनालीसा बागलने साडीतील फोटो शेअर करत सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फोटो शेअर करत तिने लिहिले की, मोत्यांचे दागिने, काळी साडी अशीच राहू दे आपल्या नात्यातली गोडी. सर्वांना मकर संक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा.

२. अमृता खानविलकर

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अमृता खानविलकरनेही काळ्या रंगाच्या साडीतील तिचा सुंदर फोटो शेअर करत लिहिले की, जेव्हा तुमच्याकडे सुंदर असा गळ्यातील दागिना असेल, तेव्हा तुम्हाला दुसरा कोणताही दागिना घालण्याची गरज नाही. आणि हो तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला.

३. ऋतुजा बागवे

चंद्र आहे साक्षीला या मालिकेतील आपल्या अभिनयाद्वारे ऋतुजा बागवे सर्वांकडून कौतुक मिळवत आहे. मकर संक्रातीनिमित्त तिनेही आपल्या साडी पेहराव्यातील फोटो शेअर करत लिहिले की, मकर संक्रातीनिमित्त सर्वांना गोड गोड शुभेच्छा.

४. सोनाली कुलकर्णी

सोनालीने आपला फोटो शेअर करत लिहिले की, तिळाचा तेज आणि गुळाचा गोडवा, हे सगळं मिळो तुम्हाला. मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा

५. पूजा सावंत

महाराष्ट्राज बेस्ट डान्सर मध्ये सध्या परिक्षकाच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री पूजा सावंतनेही आपल्या अंदाजात मकर संक्रातीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने काळ्या रंगाच्या ड्रेसवरील फोटो शेअर करत लिहिले की, शुभ मकर-संक्राती.

६. प्रार्थना बेहेरे

प्रार्थनाने एक व्हिडिओ शेअर करत मकर संक्रातीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओत सुरुवातीला तिचा मेकअप करण्यात येत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर ती काळ्या रंगाच्या साडीत सुंदर तयार झालेली दिसत आहे. व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले की, मकर संक्रातीच्या शुभेच्छा

७. सावनी रविंद्र

गायिका सावनी रविंद्रनेही इन्स्टाग्रामवर आपला सुंदर फोटो शेअर करत मकरसंक्रातीच्या शुभेच्छा दिल्या.