मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार )

मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेता मिलिंद सोमण आपल्या फिटनेससाठी नेहमीच चर्चेत असतो. मिलिंदला फिटनेस आयकॉन म्हणून देखील ओळखले जाते. आपल्या वर्कआऊटचे व्हिडीओ तो नेहमी सोशल मिडीयावर शेअर करत असतो. मिलिंदने नुकताच एक नवीन आणि भन्नाट व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.. या व्हिडिओमध्ये तो  वेगळ्या प्रकारे पुशअप्स करताना दिसतो आहे.

यामध्ये मिलिंद हवेत पुश-अप करत असल्याचे दिसत आहे. त्याचा हा व्यायामाचा अनोखा अंदाज पाहून चाहते थक्क झाले आहेत. मिलिंदचा हा व्हिडिओ चाहते पुन्हा पुन्हा बघत असल्याचे समजते आहे. या व्हिडिओद्वारे त्याने फिटनेससाठी प्रयत्न करणाऱ्यांना सल्ला देखील दिला आहे आणि प्रोत्साहितही केलं आहे.

व्हिडिओच्या  कॅप्शनमध्ये मिलिंदने लिहिले की, ‘खेळायला  कधीच विसरू नका. तंदुरुस्ती आणि आरोग्याच्या प्रयत्नांना  कधीच ओझे समजू नका. तंदुरुस्ती आणि आरोग्यामध्ये केलेल्या लहान सुधारणाही कोणत्याही परिस्थितीत हसणे सोपे करतात.’

मिलिंद सोमण याची पत्नी अंकिताही व्यायामाच्या बाबतीत खूप आग्रही आहे. कोणत्याही फिटनेस इव्हेंटला हे दोघं आपल्याला एकत्र दिसतात.

तर गेल्या काही दिवसांपूर्वी मिलिंदने त्याच्या आईच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक व्हिडिओ शेअर केला होता. त्याच्या आईचा हा व्हिडीओ पाहून आपल्याला आश्चर्य आणि कौतुक वाटेल. या मध्ये वयाच्या ८१व्या वर्षी मिलिंदची आई पंधरा पुशअप्स करताना दिसत आहे. तरुणांना लाजवेल असा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

 

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *