आपल्या नवऱ्याकडून लाड करून घेण्याचा एक आगळा वेगळा मार्ग मितालीने आजमावला आहे.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर नुकतेच विवाहबद्ध झाले आहेत. एका पारंपरिक विवाह सोहळ्यांमध्ये दोघांनी एकमेकांसोबत आयुष्यभर साथ निभावण्याची शपथ घेतली होती. त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो बरेच व्हायरल झाले होते. पारंपरिक वेशभूषेमध्ये दोघे तुफान सुंदर दिसत होते. लग्नानंतर दोघांनी एकत्र एक प्रोजेक्ट देखील साईन केला आहे आणि या दोघांचे चाहते या प्रोजेक्टची नक्कीच आतुरतेने वाट पाहत असणार.

मिताली मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमधील चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये काम करताना दिसून येते. ती एक बोल्ड अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. इन्स्टाग्रामवर मिताली बरीच सक्रिय असते. नुकताच तिने एक रील आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती काही इंग्लिश डायलॉग्जवर लिपसिंक करताना दिसून येत आहे. ‘मुलींना काय हवं असतं हे मुलींनाच माहीत नसतं. पण मला फुलं हवी आहेत.’ असं मिताली म्हणताना दिसून येतेय. आणि तिने या पोस्टमध्ये आपला नवरा सिद्धार्थ चांदेकर याला मेन्शन केलं आहे. अर्थातच आपल्या नवऱ्याकडून लाड करून घेण्याचा एक आगळा वेगळा मार्ग मितालीने आजमावला आहे. आता सिद्धार्थ मितालीला फुलं देतोय का, हे लवकरच त्याच्या इंस्टाग्राम पोस्ट वरून समजेलच.

https://www.instagram.com/reel/CS0117iqAKP/?utm_source=ig_web_copy_link

सिटी ऑफ ड्रीम्सच्या सिझन टू मध्ये सिद्धार्थ चांदेकर दिसून आला होता. लाडाची मी लेक गं या मालिकेमध्ये मिताली दिसली होती. त्याचप्रमाणे मिताली वेबसीरिजमध्ये देखील दिसून आली होती. सेक्स ड्रग्ज अँड थिएटर या वेबसीरिज मध्ये ती दिसली होती. मिताली आणि सिद्धार्थ एकत्र काम करणारा प्रोजेक्ट लवकरच प्रदर्शित होईल. प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर या दोघांचे चाहतेही प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.