साध्या हिरव्या रंगाच्या साडीत मिताली दिसतेय कमालीची सुंदर.

अवघ्या चोवीस वर्षांच्या मिताली मयेकरने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कमी कालावधीत आपले स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. मिताली नुकतीच सिद्धार्थ चांदेकरसोबत विवाहबंधनात अडकली. पुण्यातील एका प्रसिद्ध वाड्यात पारंपरिक पद्धतीने त्यांचा विवाह सोहळा पार पडला होता. लग्नाच्या दिवशी मितालीने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. नऊवारीमध्ये मिताली कमालीची देखणी दिसत होती. तिने तिच्या लग्नाच्या साड्या मुंबईमधील सिल्क पॅलेसमधून घेतल्या होत्या. साडीवरचं प्रेम तर भारतीय मुलींसाठी जगण्याचा अविभाज्य भाग आहे. मग सेलिब्रिटी मिताली ह्याला कशी अपवाद राहील?

मिताली सिनेमांमध्ये आणि वेब सीरिजमध्ये आता काम करते आहे. २०१९ मध्ये झी फाइव्हवर प्रदर्शित झालेल्या ‘सेक्स ड्रग्ज अँड थिएटर’ या वेब सीरिजमध्ये मिताली दिसली होती. आगामी हॅशटॅग प्रेम या सिनेमामध्ये मितालीची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. मिताली इन्स्टाग्रामवर सतत आपले फोटो टाकून आपल्या चाहत्यांना प्रभावित करीत असते.

इंडियन असो किंवा वेस्टर्न असो कुठलाही पेहराव मिताली अगदी सहजरित्या परिधान करते. त्या सहजतेमधून ती एक ग्रेस निर्माण करते. वैविध्यपूर्णतेचे हे ग्लॅमर तिच्या फोटोमधून साफ झळकते. बोल्डनेसच्या बाबतीतही मिताली अजिबात मागे नाहीये. आपले बरेच बोल्ड फोटो ती आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते. ट्रोलिंगची चिंता न करता.

पण यावेळी चर्चा मितालीच्या बोल्डनेसची नाहीये. तर तिच्या साध्या सरळ साडीमधील एका सोज्ज्वळ फोटोची आहे. या फोटोमध्ये तिने ब्राइट हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. निळ्या रंगाची बॉर्डर असलेली ही साडी साधी पण खूप सुंदर आहे. नाकात नथ आणि कानातले आणि अंबाडा अश्या जेमतेम साजश्रुंगारामध्ये देखील ती अतिशय सुंदर दिसत आहे. तिने या फोटोला ‘दिल कही खोया है ‘ हे कॅप्शन दिले आहे.