अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार)

नाटक, चित्रपट आणि मालिकांमुळे नावारूपास आलेल्या गुणी अभिनेत्रींपैकी एक म्हणजे मृण्मयी देशपांडे. आपल्या सुंदर अभिनयाने ती प्रेक्षकांचा मनाचा ठाव घेते. मृण्मयीने आपल्या करिअरची सुरुवात २००८ साली प्रदर्शित झालेल्या ‘हमने जिना सिख लिया’ या हिंदी  चित्रपटातून केली. मूळची पुण्याची असलेल्या मृण्मयीची ‘अग्निहोत्र’ ही मालिका खूप गाजली. परंतु मृण्मयीला खरी ओळख मिळवून दिली ती झी मराठीवरच्या ‘कुंकू’ या मालिकेने. या मालिकेतील ‘जानकी’ या भूमिकेने मृण्मयीला प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचवले.

काही काळासाठी मृण्मयीने कलर्स मराठीवरच्या ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या विनोदी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ही केले आहे. मृण्मयीचे ‘अ फेअर डील’ हे नाटक खूप गाजले. या वर्षी मार्च महिन्यात मृण्मयीने ‘मन फकीरा’ या मराठी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले. या चित्रपटामुळे मृण्मयी आपल्याला पहिल्यांदाच दिग्दर्शिकेच्या भूमिकेत दिसली. मृण्मयीला अभिनया बरोबरच नृत्याची ही आवड आहे. मृण्मयीने अनेक सुपरहिट  मराठी चित्रपटात काम केले आहे.

मोकळा श्वास – कांचन अधिकारी दिग्दर्शित या चित्रपटात मृण्मयीबरोबर मोहन जोशी, शरद पोंक्षे, प्रतीक्षा लोणकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

नवरा माझा भवरा

संशय कल्लोळ – झी टॉकीज निर्मित या विनोदी  चित्रपटात मृण्मयी सोबत आपल्याला अभिनेता अंकुश चौधरी, अभिनेत्री सुरेखा तळवळकर, अभिनेत्री क्षिती जोग, अभिनेत्री पुष्कर श्रोत्री मुख्य भूमिकेत दिसतात.

धामधूम

लेक माझी गुणाची

पुणे वाया बिहार – या चित्रपटात मृण्मयीबरोबर उमेश कामत मुख्य भूमिकेत दिसतो.

आंधळी कोशिंबीर

साटं लोटं सगळं खोटं

बायोस्कोप

कट्यार काळजात घुसली – सुबोध भावे दिग्दर्शित या चित्रपटाद्वारे मराठी रंगभूमीवरील अत्यंत लोकप्रिय आणि गाजलेले कट्यार काळजात घुसली  या नाटकाचे मोठ्या पडद्यावर रूपांतर करण्यात आले. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. मृण्मयीने साकारलेल्या ‘उमा’ या भूमिकेचं विशेष कौतुक करण्यात आले आहे.

नटसम्राट – ज्येष्ठ अभिनेता डॉक्टर श्रीराम लागू यांच्या गाजलेल्या नाटकाचे महेश मांजरेकर यांनी चित्रपटात रूपांतर केले. या चित्रपटात नाना पाटेकर हे मुख्य भूमिकेत दिसतात. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. नाना पाटेकर आणि मृण्मयीबरोबर या चित्रपटात सुनील बर्वे, नेहा पेंडसे, मेधा मांजरेकर हे कलाकार दिसतात.

गुलमोहर

ध्यानीमनी

शिकारी

फर्जंद –शिवाजी महाराजांच्या मावळ्यांपैकी एक असणाऱ्या शूर सरदार कोंडाजी फर्जंद यांच्या पराक्रमावर आधारित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप गाजला. या चित्रपटात मृण्मयीला मृणाल कुलकर्णी, प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर हे  सहकलाकार म्हणून लाभले.

बोगदा

भाई व्यक्ती की वल्ली

मिस यु मिस्टर – अग्निहोत्र या मालिकेनंतर सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी ही सुंदर जोडी आपल्याला या चित्रपटात पुन्हा एकदा बघायला मिळते.

फत्तेशिकस्त – दिगपाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटात मृण्मयी बरोबर अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *