फुटबॉल प्रशिक्षक 'विजय बारसे' यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. अमिताभ बच्चन या सिनेमामध्ये फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारताना दिसून येणार आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीतील आजवरचा सर्वात जास्त यशस्वी ठरलेला सिनेमा म्हणजे सैराट. या सिनेमाने कमाईचे सर्व रेकॉर्ड्स मोडले होते. शंभर कोटी आणि त्यावर कमाई करणारा हा एकुलता एक मराठी सिनेमा आहे. मराठी सिनेमांनी स्वतःची एक चौकट निर्माण केली होती. या चौकटीच्या बाहेर जाऊन नागराज मंजुळे यांनी गावाकडची एक साधीसुधी प्रेमकथा घेऊन हा इतिहास घडवला आहे. त्यामुळे नागराज मंजुळे यांचे मराठी चित्रपटसृष्टीतील आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील स्थान अतिशय उंचावले आहे. म्हणूनच महानायक अमिताभ बच्चन यांनी नागराज मंजुळे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला.

या दोघांचा ‘झुंड’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार की ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार याबाबत बराच गोंधळ निर्माण झाला होता. पण आता सूत्रांकडून अशी माहिती मिळते आहे की, या सिनेमाचे ओटीटी प्लॅटफॉर्मचे राईटस ३३ कोटी रुपयांना विकले गेले आहेत. आणि लवकरच हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो. या चित्रपटाचा टीजर मागे प्रदर्शित झाला होता. ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. सैराट फेम रिंकू राजगुरू देखील या सिनेमामध्ये असणार आहे अशी चर्चा आहे.

हा सिनेमा फूटबॉल प्रशिक्षक ‘विजय बारसे’ यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. अमिताभ बच्चन या सिनेमामध्ये फूटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारताना दिसून येणार आहेत. कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे महाराष्ट्रातील बरीच सिनेमागृहे आजही बंद आहेत. आणि इतर राज्यांमध्ये देखील काही चित्रपटगृहे मर्यादित क्षमतेनुसार सुरू करण्यात आली आहेत. म्हणूनच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचे ठरवले असावे. या चित्रपटाचे संगीत अजय अतुल यांनी केले आहे. तर तुम्ही हा सिनेमा पाहण्यासाठी किती उत्सुक आहात? कळवा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये.