कंगनावरील वादग्रस्त टीप्पणीवरून स्वरा भास्करचा काँग्रेस आमदार सुखदेव पानसे यांच्यावर हल्ला / फोटो इन्स्टाग्रामवरून साभार

अभिनेत्री स्वरा भास्कर आणि कंगना राणावत दोघीही सोशल मीडियावर खूपच एक्टिव्ह असून वेगवेगळ्या मुद्द्यांवर दोघीही आपली मते ठामपणे मांडताना दिसतात तसेच एकमेकींच्या मतांना विरोधही करताना दिसतात. त्यामुळे यापूर्वी अनेकदा दोघींमध्ये ट्विटवर जोरदार वादही झाले आहेत. शेतकरी आंदोलनावरूनही दोघींनी एकमेकींना लक्ष्य केले. शेतकरी आंदोलनावरून काँग्रेसचे आमदार सुखदेव पानसे यांनी कंगना राणावतवर केलेल्या वादग्रस्त टीप्पणीवरून अभिनेत्री स्वरा भास्करने आमदार पानसे यांच्यावर जोरदार हल्ला केला तसेच कंगनावरही टीका केली.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे आमदार खुसदेव पानसे यांनी कंगनावर टीका करताना तिला ‘नाचगाणारी, आयटम गर्ल’ म्हटले होते. ‘अशी महिला शेतकऱ्याचा स्वाभिमान दुखावते आणि त्याविरोधात जेव्हा काँग्रेस कार्यकर्ते उभे राहतात तेव्हा पोलीस त्यांच्यावर लाठीमार करतात आमदार पानसेने म्हटले होते. एवढेच नाही तर, केवळ एका महिलेवरून पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार केल्याचेही ते म्हणाले. त्यांच्या या टीप्पणीवर कंगना राणावतने त्यांच्यावर पलटवार करताना त्यांना मूर्ख म्हटले होते.

‘हे जे कोणी मूर्ख आहेत त्यांना माहिती नाही की मी दीपिका, कतरिना, आलिया भट्ट नाही. मी एकटीनेच आयटम साँग करण्यास तसेच बड्या हिरोंसोबत काम करण्यासही नकार दिला होता. त्यामुळे बॉलीवूडमधील पुरुष-महिला माझ्याविरोधात झाले आहेत. मी एक राजपूत स्त्री असून कंबर हलवत नाही, हाडे मोडते.’ असे ट्विट कंगनाने केले होते ,कंगनाचे हे ट्विट खूपच व्हायरल झाले होते.
त्यानंतर शेतकऱ्यांसंदर्भात तिने केलेल्या वक्तव्यांबद्दल तिने शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली होती. तसे न केल्यास तिच्या ‘धाकड’ चित्रपटाचे शुटिंग रोखण्याचा इशाराही दिला होता.

दरम्यान, सुखदेव पानसे यांनी कंगनावर केलेल्या वादग्रस्त टीप्पणीवरून आता स्वरा भास्करने त्यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. ‘सुखदेव पानसे यांनी मूर्खपणाचे, खूपच सेक्सिस्ट आणि निषेधार्थ वक्तव्य केले. कंगना तू त्याला आणखी वाईट बनवले’ अशा शब्दांत ट्विट करून स्वरा भास्करने एकाच ट्विटमध्ये आमदार पानसे व अभिनेत्री कंगना दोघांवरही निशाणा साधला आहे.

swara bhaskar slams congress mla sukhdev panse and kangana ranaut