या अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेले बिकिनीतील ग्लॅमरस, बोल्ड फोटो पाहून चाहते झाले घायाळ / फोटो इन्स्टाग्रामवरून साभार

बॉलीवूडमधील चित्रपटांपासून दूर राहूनही चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री काजोलची बहीण अभिनेत्री तनीषा मुखर्जी. सोशल मीडियावर एक्टिव्ह असलेली ही अभिनेत्री आपल्या फोटोंमुळे चर्चेचा विषय बनत असते. तिचे फोटोही चाहत्यांना खूप आवडतात. त्यामुळे तनीषा चित्रपटांमध्ये विशेष कमाल दाखवू शकली नसली तरी आपल्या बोल्ड फोटोंमुळे ती सातत्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. आता सोशल मीडियावर आलेल्या तिच्या फोटोंची खूप चर्चा आहे.

बॉलीवूडमधील सुपरस्टारच्या कुटुंबाशी संबंधित असलेली तनीषा गेल्या अमेक वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. पण आजही ती चाहत्यांच्या संपर्कात असून सोशल मीडियावर एक्टिव्ह आहे. तिचे फोटो चाहते खूप पसंत करत असून आता नुकतेच तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर जे फोटो शेअर केले आहेत त्यामुळे चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढू लागली आहे. या फोटोंमधील तिचा सुंदर आणि ग्लॅमरस लुकमुळे चाहते घायाळ झाले असून या फोटोंवर चांगल्या कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. तिने जे फोटो शेअर केले आहेत त्यामध्ये ती हिरव्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसते.

आपल्या हॉट फोटोंमुळे तनीषा चर्चेत राहण्याची ही तशी पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही तिने आपले काही हॉट फॉटो शेअर केले आहेत. तिचे फोटो पाहून तिचे जिजाजी अभिनेता अजय देवगण यानेही त्यावर कमेंट केली होती. आपल्या मेहुणीच्या फोटोंवर कमेंट करताना त्याने लिहिले होते की, काजोलबरोबरच तिची बहीणही खूपच सुंदर आहे. अशा प्रकारे आपल्या फोटोंसाठी ही 42 वर्षीय अभिनेत्री चाहत्यांकडून कौतुक मिळवत असते.

चित्रपटांपेक्षा जास्त ती तिच्या व्यक्तिगत आयुष्यामुळे चर्चेत असते. तिने बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटांतून काम केले पण त्यापैकी बरेचसे चित्रपट फ्लॉप ठरले. ‘नील अँड निकी’, ‘सरकार’, ‘सरकार राज’, ‘टँगो चार्ली’, ‘वन टू थ्री’ या चित्रपटांतून तिने काम केले. तिचा शेवटचा ‘अन्ना’ हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर विशेष कमाल दाखवू शकला नव्हता. त्यानंतर टीव्हीवरील रियालिटी शो ‘बिग बॉस’च्या एका सिझनमध्येही ती दिसली होती. त्यावेळी अभिनेता अरमान कोहली याच्याशी तिच्या अफेअरची चर्चा झाली होती.

actress tanisha mukherjee share bikini pictures and fans got crazy