अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री परिणिती चोप्रा (फोटो सोशलमीडियावरुन साभार)

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याने मागील काही दिवसांपूर्वीच त्याच्या आगामी ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाची घोषणा केली होती. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटात रणबीरसोबत अभिनेते अनिल कपूर, बॉबी देओल, परिणिती चोप्रा इत्यादी कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा टीझर देखील समोर आला आहे, जो खूपच उत्कंठावर्धक वाटत आहे. त्यामुळे त्याच्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. या चित्रपटात रणबीरच्या पत्नीच्या भूमिकेत कोण झळकणार ? याची माहिती आता समोर आली आहे.

रणबीरच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘कबीर सिंह’ या सिनेमाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा करणार आहेत. हा चित्रपट वडिल आणि मुलाच्या नात्यावर आधारित आहे. अनिल कपूर या चित्रपटात रणबीरच्या पित्याची भूमिका साकारणार असून रणबीर मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात परिणिती व्यतिरिक्त आणखी एका अभिनेत्रीचा समावेश असणार असल्याचे सांगितले जातेयं. ‘पिंकविला’ ने दिलेल्या माहितीनुसार हा चित्रपट एक गॅंगस्टर ड्रामा असणार आहे. परिणिती या चित्रपटात रणबीरच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार असून पहिल्यांदाच हे दोघे एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनाही या जोडीला पडद्यावर पाहण्याची उत्सुकता आहे.

रणबीरच्या या चित्रपटा व्यतिरिक्त बोलायचे झाल्यास तो त्याच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात ही लवकरच दिसणार आहे. हा चित्रपट मागील वर्षापासून चर्चेत आहे. कारण या चित्रपटात रणबीर पहिल्यांदाच त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री आलिया भट्टसोबत प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. दोघे ही ऑनस्क्रिन एकत्र काम करताना दिसणार आहेत. या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले असून, चित्रपटाच्या वीएफएक्सव सध्या काम सुरु आहे. त्यामुळे याच वर्षात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. करण जोहरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.