पार्थ समथान आणि खुशाली कुमार (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार)

‘कसोटी जिंदगी की २’ फेम अभिनेता पार्थ समथान दीर्घकाळापासून त्याच्या ‘पहले प्यार का पहला गम’ या म्यूझिक व्हिडिओमुळे चर्चेत आहे. तर आता हा म्यूझिक व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये पार्थसोबत खुशाल कुमारही दिसत असून दोघेही रोमँटिक अंदाजात दिसून येत आहेत. चाहत्यांकडून या व्हिडिओला फारच पसंती मिळत आहे.

गुलशन कुमार यांची मुलगी खुशाली कुमार आणि पार्थ समथान यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. तर गुलशन कुमार यांचीच दुसरी मुलगी तुलसी कुमारने जुबिन नॉटियालसोबत हे गाणं गायलं आहे. मनन भारद्वाज यांनी या गाण्याला संगीत दिले आहेत. तर जावेद अख्तर यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत.

या व्हिडिओत लव्ह आणि रोमान्सबद्दल बोलण्यात आले आहे. गाणं प्रदर्शित झाल्यानंतर दोन तासाच्या आतच साडे चार लाखापेक्षा अधिकवेळा पाहण्यात आलं आहे. हे गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरत असून पार्थ आणि खुशालीच्या केमिस्ट्रीचीही चाहते कौतुक करत आहेत.

१९९६ मध्ये आलेल्या ‘पापा कहते है’ या चित्रपटातील ‘पहले प्यार का पहला गम’ या गाण्याचा हा रिमेक आहे. मूळ गाणं मयूरी कांगो आणि जुगल हंसराज यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. कविता कृष्णमृती यांनी हे गाणं गायले होते तर असून जावेद अख्तर यांनी या गाण्याचे बोल लिहिले होते.

पार्थ छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेता आहे. सोशल मीडियावरही तो फारच सक्रिय राहतो. याद्वारे तो आपल्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती चाहत्यांना देत असतो. प्रोफेशनल वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास पार्थ समथान लवकरच ‘मैं हीरो बोल रहा हूं’ मध्ये दिसणार आहे. यामध्ये तो एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. सोबतच पार्थबाबत असे सांगितले जात आहे की, तो लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार आहे. आलिया भट्टच्या रेसुल पोकुटीचा चित्रपट ‘पिहरवा’ यामधून डेब्यू करणार आहे.