'प्रोजेक्ट के' एक सायन्स फिक्शन मुव्ही असणार आहे.

एस एस राजामौली यांच्या बाहुबली सिनेमाने बरेच नवे नवे रेकॉर्ड आपल्या नावावर प्रस्थापित केले होते. या सिनेमाने प्रभास, अनुष्का शेट्टी आणि राणा डुग्गुबाती या सर्वांच्या करिअरला एका स्टेबल वळणावर आणले होते. ‘आखीर कटप्पाने बाहुबली को क्यों मारा?’ या एका प्रश्नाने समस्त भारतीयांची झोप मात्र उडवली होती. अखेर दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर बाहुबलीचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आणि अमरेंद्र बाहुबली नावाच्या वादळाने सर्वांना पुन्हा एकदा वेड लावले होते.

हा अमरेंद्र बाहुबली म्हणजे साऊथ सुपरस्टार प्रभास होय. पुन्हा एकदा एक नवा प्रोजेक्ट घेऊन आपल्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘प्रोजेक्ट के’ असे या सिनेमाचे नाव आहे. आणि या सिनेमामध्ये त्याच्यासोबत अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, नागी हे कलाकार दिसणार आहेत. ही एक सायन्स फिक्शन मुव्ही असणार आहे. सुपरस्टार लोकांची गर्दी असलेला हा सिनेमा नक्कीच एक हटके आणि वेगळा असेल यात काही शंका नसावी.

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये प्रभास याने ‘साहो’ या सिनेमातून पदार्पण केले होते. श्रद्धा कपूर त्यांच्यासोबत या सिनेमांमध्ये लीड ॲक्टरेस म्हणून दिसली होती. तर मंदिरा बेदी, नील नितीन मुकेश, चंकी पांडे देखील या सिनेमांमध्ये महत्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकले होते. बऱ्याच दिवसांपासून अशी चर्चा चालू होती की, दीपिका पदुकोण आणि प्रभास एका मोठ्या प्रोजेक्टसाठी एकत्र काम करतील. पण मागच्या वर्षी दीपिका पदुकोणचे नाव ड्रग रॅकेटमध्ये सापडल्यामुळे, या सिनेमाचे काम तूर्तास खंडित करण्यात आले होते. पण निर्मात्यांनी आता या प्रोजेक्टसाठी पुन्हा एकदा नव्या जोशाने काम करण्याचा जोर धरला आहे. या सिनेमाचे शूटिंग काल गुरुपौर्णिमेच्या शुभमुहुर्तावर सुरू करण्यात आले आहे. प्रभासने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन खुद्द ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे.