खो खो, संघर्ष, आणि डॉ काशिनाथ घाणेकर, पार्टी, डोक्याला शॉट अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.

अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकताच आपल्या कविता संग्रहाचे पुस्तक प्रकाशित केले आहे. ‘प्राजक्त प्रभा’ असे या पुस्तकाचे नाव आहे. काही कालावधीच्या आतच या पुस्तकाच्या बऱ्याच प्रती विकल्या गेल्या होत्या. अभिनेत्री, कवयित्री प्राजक्ता माळी इंस्टाग्रामवर बरीच सक्रिय असते. नुकताच तिने आपल्या इंस्टाग्रामवर आपला एक अतिशय सुंदर फोटो शेअर केला आहे. पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये ती तुफान सुंदर दिसत आहे. ‘डाव्या डोळ्यावर बट ढळली’ असे कॅप्शन देत तिने हा सुंदर फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे प्रसिध्दीच्या झोतात आलेल्या प्राजक्ताने २०११ मध्ये सुवासिनी या स्टार प्रवाहवरील मालिकेमधून अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने बऱ्याच नाटकांमध्ये आणि मालिकांमध्ये काम करून आपण एक उत्तम अभिनेत्री आहोत हे वेळोवेळी सिद्ध केले आहे. ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ या मालिकेतील तिच्या विनोदी भूमिकेने तिने अख्ख्या महाराष्ट्राचे मन जिंकले होते. त्यानंतर आलेल्या ‘हम्पी’ सिनेमामध्ये मात्र ती प्रचंड वेगळ्या भूमिकेमध्ये दिसली होती. बोल्ड, बिनधास्त, मोकळ्या मनाची असणारी गिरिजा तिने अतिशय उत्तमरीत्या निभावली होती. लवकरच तिचा ‘लक डाऊन’ हा सिनेमा  प्रदर्शित होणार आहे. त्याचप्रमाणे ‘वाय’ हा सिनेमात देखील प्रदर्शित होणार आहे.

खो खो, संघर्ष, आणि डॉ काशिनाथ घाणेकर, पार्टी, डोक्याला शॉट अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. झी मराठीवरील ‘मस्त महाराष्ट्र’ त्याचप्रमाणे सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या दोन शोचे तिन्ही होस्टींग देखील केले आहे. एक होस्ट, एक अभिनेत्री असण्यासोबतच ती एक उत्तम कवयित्री देखील आहे.